
निसर्गाने भरभरून नटलेले, जव्हार हे नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. जव्हार ला ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला, संस्कृती व परंपरेचा समृद्ध वारसा आहे. मात्र, त्यांचा विकास झालेला नाही.
मोखाडा - निसर्गाने भरभरून नटलेले, जव्हार हे नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. जव्हार ला ऐतिहासिक, सांस्कृतिक, कला, संस्कृती व परंपरेचा समृद्ध वारसा आहे. मात्र, त्यांचा विकास झालेला नाही. जव्हार ला 'ब' पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा ही गेल्या अनेक दशकांची मागणी होती. अखेर महाविकास आघाडी सरकार ने ती मान्य करून जव्हार ला 'ब' पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याचा निर्णय 6 नोव्हेंबरला घेतला असून जव्हार करांना दिवाळी भेट दिली आहे. शासनाच्या धोरणानुसार 'ब' दर्जाच्या पर्यटन विकासासाठी प्रतीवर्षी 5 कोटी रूपयांचा निधी मिळणार असल्याने, आता जव्हार च्या विकासाला खर्या अर्थाने सुरूवात होणार आहे.
वसई ते सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा; नागरिकांसह प्रवासी संघटना आग्रही
विक्रमगड विधानसभेच्या विकासासाठी 400 कोटींच्या घसघशीत निधी ला मंजुरी देण्यापाठोपाठ, जव्हार ला 'ब' पर्यटनस्थळाचा दर्जा देऊन महाविकास आघाडी सरकार ने आदिवासी भागाच्या विकासाला खर्या अर्थाने सुरूवात केली आहे. जव्हार हे नैसर्गिक पर्यटन स्थळ आहे. येथे 125 ते 150 मी मी पर्जन्य प्रमाण आहे. तर जव्हार हे समुद्र सपाटीपासुन 1 हजार 700 फुट उंचीवर चे ठिकाण आहे. येथे थंडीचे प्रमाण ही जास्त असल्याने जव्हार प्रतीमहाबळेश्वर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. जव्हार मध्ये जयविलास पॅलेस, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावण झालेला शिरपामाळ, हनुमान पाॅईट, सनसेट पाॅईट, जुना राजवाडा, जयसागर धरण, विजयस्तंभ, दगडी बांधकामाचा सुर्यतलाव, जांभुळविहीर, फिल्टर हाऊस या प्रेक्षणीय स्थळे आणि तालुक्यात दाभोसा,व काळमांडवीसह अनेक धबधबे आहेत. त्यामुळे प्रतीवर्षी 5 ते 6 लाख पर्यटक जव्हार ला येतात.
जव्हार ला 'ब' पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा ही गेल्या अनेक दशकांची मागणी होती. जव्हार नगरपरिषदेच्या स्थापनेला 101 वर्ष पुर्ण झालेले आहेत. 'ब' दर्जा मिळावा म्हणून पालघर जिल्हाधिकार्यांनी 29 जानेवारी 2020 ला शासनाकडे शिफारस केली होती. त्याची तातडीने दखल घेत महाविकास आघाडी सरकार ने 6 नोव्हेंबर ला जव्हार ला 'ब' पर्यटनस्थळाचा दर्जा दिल्याचा निर्णय घेऊन परिपत्रक जाहीर करून जव्हार करांना दिवाळी भेट दिली आहे.
लॉकडाऊनमुळे फटाका मार्केटवर परिणाम, सुमारे एक हजार कामगारांच्या रोजगारावर गदा
जव्हार ला 'ब' पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा ही अनेक वर्षाची मागणी होती. त्यासाठी लोकप्रतिनिधी व अधिकार्यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकार आणि पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे यांनी सहानुभूती पुर्वक विचार करून, जव्हार ला 'ब' पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास मंजुरी दिली आहे. आता जव्हार चा महाबळेश्वर आणि माथेरानच्या धर्तीवर विकास करणार आहे.
चंद्रकांत पटेल,
नगराध्यक्ष जव्हार नगरपरिषद.
जव्हार 'क' दर्जाचे पर्यटन स्थळ होते. त्यामुळे पर्यटन विकासासाठी भरीव निधी येत नव्हता. आता 'ब' दर्जा मिळाल्याने शासनाचा पर्यटन विकासाचा "बांधील निधी " मिळणार आहे. सरकारी योजना ही येतील, तर आदिवासी संस्कृती ची माहिती पर्यटकांना मिळावी म्हणून आम्ही "आदिवासी सृष्टी " हा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.
अॅड. प्रसाद बोरकर,
मुख्याधिकारी, जव्हार नगरपरिषद.
Jawahars crown Status of B tourist destination by the state government
--------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )