"भारतीय जनता पक्ष पुन्हा शिवसेनेच्या शोधात... "

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 November 2019

आज घडलेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हंगामी गटनेते म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर  जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये आज सकाळी घटलेल्या घटनांवर जयंत पाटील यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये पक्षाची पुढील भूमिका काय असेल, त्याचसोबत अजित पवार यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे याबद्दलही त्यांनी भाष्य केलं.  

आज घडलेल्या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हंगामी गटनेते म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे. यानंतर  जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यामध्ये आज सकाळी घटलेल्या घटनांवर जयंत पाटील यांनी पत्रकारांना सविस्तर माहिती दिली. यामध्ये पक्षाची पुढील भूमिका काय असेल, त्याचसोबत अजित पवार यांच्यावर कशा प्रकारे कारवाई करण्यात येणार आहे याबद्दलही त्यांनी भाष्य केलं.  

काय म्हणालेत जयंत पाटील :  

 • आज अजित पवार यांची मागच्या बैठकीतील गटनेता म्हणून झालेली निवड रद्द करण्यात आली. 
 • राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझ्याकडे (जयंत पाटील) आता गटनेता पदाची सूत्र देण्यात आली आहेत. येत्या दिवसात यामध्ये बदल झालेला दिसू शकतो.  
 • राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक आमदार दुरून मुंबईकडे येतायत. अशात काही आमदार अजूनही मुंबईत पोहोचले नाहीत. 
 • आताच राष्ट्रवादीचे राजू नवघरे हे मुंबई विमान तळावर उतरलेत 
 • दिवसभरातून अनेक आमदार अजूनही येतायत. काही आमदार नागपूर आणि भंडाऱ्या वरून येतायत. ते उद्या मुंबईत पोहोचतील. 
 • 54 पैसे 49  आमदारांनी शरद पवारांच्या निर्णयावर पाठींबा दिला आहे.  
 • अजित पवार यांच्या हकालपट्टी बाबतीत सर्व निर्णय  शरद पवार आणि माझ्याकडे ( जयंत पाटील ) असेलत तरीही पुढील एक दोन दिवसात कायदेशीर बाबी तपासून पुढील निर्णय घेण्यात येतील  
 • पक्षाच्या वतीने अजित पवार यांच्यासोबत बातचीत करण्यासाठी तीन नेते गेले होते 
 • आमच्याकडे सह्या आहेत आम्ही कधीही खोटा दावा करत नाही 
 • आता पुन्हा भाजप शिवसेनेच्या शोधात आहे असं मला समजलंय  
 • भाजप विश्वास दर्शक ठराव मांडतील किंवा मांडू देखील शकणार नाही 
 • आमचे  शिवसेना आणि कॉंग्रेसचे आमदार एकत्र आहेत.  उद्या 2 पर्यंत पुन्हा बैठक होईल. 
 • आम्ही सहा सेट मध्ये सह्या घेतल्या होत्या. पक्षाचे सरचिटणीस यांच्याकडे या सह्यांचे सेट होते, यापैकी एक सेट अजित पवार यांनी घेतला
 •  या सह्यांच्या सेटवर कोणतीही तारीख किंवा उद्धेश लिहिला नव्हता, त्यामुळे त्यांचा वापर झाला आई त्याचा उपयोग करून सत्ता स्थापन करण्यात आली 
 • यावर कायदेशीर सल्ला आम्ही घेतोय, उद्या कारवाई करू
 • भाजप सोबत सत्ता स्थापन करणे ही राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची प्रतारणा आहे. म्हणूनच त्यांना काढलं
 • अजित पवार आणि माझा (जयंत पाटील ) यांचा संपर्क झालेला नाही 
 • राष्ट्रवादी कडून सर्वोच्च पद अजित पवार यांनाच देण्यात येणार होतं 

आता आज घडलेला सर्व प्रकार पाहता उद्या राष्ट्रावाई कॉंग्रेसकडून अजित पवार यांच्यावर काय कारवाई करण्यात येतेय आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर काय नाट्य पाहायला मिळते यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. 

WebTitle : jayant patil on todays happenings about NCP and ajit pawar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patil on todays happenings about NCP and ajit pawar