जयंत पाटील यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत 'मोठं' आणि सूचक विधान, म्हणालेत...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 10 June 2020

आजच्या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं आणि सूचक विधान केलंय.

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस, गेल्या २१ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचा पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज २१ वा वर्धापन दिवस आहे. यानिमित्ताने मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात फिजिकल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करून आजचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ध्वजारोहण केलं. दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने जयंत पाटील यांनी एक मोठं आणि अत्यंत सूचक विधान केलंय. विधान आहे महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाबाबत.

यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर कडाडून टीका केली. मागील २१ वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तारत गेला. मात्र गेल्या काही वर्षात शरद पवारांच्या पक्षाला फोडण्याचा, त्याचे लचके तोडण्याचे अनेक प्रयत्न भाजपकडून करण्यात आलेत. काही अंशी भाजपाला त्यामध्ये यश मिळालं मात्र भाजप त्यात संपूर्ण यशस्वी होऊ शकला नाही. लोकांना दलबदलू नेते आवडत नाहीत. त्यामुळे लोकांनी भाजपाला मिळालेल्या यशाचं अपयशात रूपांतर केलं.

मोठी बातमी - उरी स्टाइल ट्विट करत मुंबई पोलिस विचारतायत 'हाऊज द...'

जयंत पाटील यांचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान :

दरम्यान आजच्या वर्धापनदिन कार्यक्रमानिमित्त बोलताना जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं आणि सूचक विधान केलंय. जयंत पाटील म्हणालेत, "आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्यमंत्री झाला नाही. मात्र कार्यकर्त्यांची तशी इच्छा आहे आणि जर अशी अपेक्षा केली नाही तर पक्ष पुढे कसा जाईल" असं विधान जयंत पाटील यांनी केलंय.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील NCP च्या वर्धापनदिनानिमित्त फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सर्वांशी संवाद साधला. शरद पवार हे सध्या निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत.

मोठी बातमी  - अरे वाह! मुंबईत कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्येत 'अशी' झाली घट

गेली दोन दशकं पक्षात अनेक मोठे चढ उत्तर पाहिलेत. पक्षाने अनेक नेत्यांना भरभरून दिलं. अनेकजण स्वतःच्या सत्तेसाठी आणि संस्थांसाठी पक्ष सोडून गेलेत पण त्याचा पक्षावर परिणाम झाला नसल्याचं शरद पवार म्हणालेत. दरम्यान शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या कामाचं कौतुक केलं. याचसोबत NCP हा पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याने हा पक्ष कधीच संपला नाही असं देखील ते म्हणालेत. 

jayant patils comment on expansion of NCP party and CM of maharashtra


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jayant patils comment on expansion of NCP party and CM of maharashtra