Jio Network: मुंबईत जिओचे नेटवर्क ठप्प; इंटरनेट सेवा गुल्ल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

reliance jio

Jio Network: मुंबईत जिओचे नेटवर्क ठप्प; इंटरनेट सेवा गुल्ल

मुंबई : देशातील आघाडीची मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणारी कंपनी असलेल्या जिओचे (Jio) नेटवर्क मुंबईत डाऊन झाल्याची माहिती समोर येत आहे. दुपारी १२.१५ वाजतापासून नेटवर्क डाऊन असल्याचे समजते. यामुळे मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे. हा बिघाड कशामुळे झाला, याची माहिती अद्याप समजू शकलेली नाही.

शहरातील उड्डाणपुलांवरील मोबाइल नेटवर्क टॉवरविषयीच्या करारास मुदतवाढ देण्यास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नकार दिला आहे. करार संपल्याने पुलावरील टॉवर हटवून संबंधित साहित्य जप्त करण्याची कारवाई एमएसआरडीसीकडून सुरू आहे. या कारवाईमुळे कॉल ड्रॉप, कॉल न लागणे, आवाज अस्पष्ट येणे, मोबाइल नेटवर्क नसणे, इंटरनेट (Internet service is down) वेग कमी होणे असा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.

हेही वाचा: शिवशाहीचा अपघात : एकाचा मृत्यू तर सहा जण जखमी

एक तास झाला असतानाही सेवा पूर्ववत झालेली नाही. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कंपनीकडून तांत्रिक बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. बिघाड कशामुळे झाला याची कोणतीही माहिती जिओकडून (Jio Network) देण्यात आलेली नाही.

Web Title: Jio Network Internet Service Is Down Mumbai Thane Navi Mumbai Mobile

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..