खडसेंच्या प्रवेशाआधी राजकीय घडामोडी, जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला, चर्चांना उधाण

सुमित बागुल
Friday, 23 October 2020

जर एकनाथ खडसे यांच्यासारखा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असेल तर त्यांना पक्षात मोठी जबाबदारी देखील दिली जाऊ शकते.

मुंबई : थोड्याच वेळात एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. अशात महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शरद पवारांच्या भेटीला वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचलेत. शरद पवार बऱ्याच काळापासून वाय बी चव्हाण सेंटरमध्ये दाखल झालेत.थोड्याच वेळेत ते देखील NCP ऑफिसमध्ये दाखल होणार आहेत. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. दरम्यान एकनाथ खडसे यांच्या पक्ष प्रवेशाआधी जितेंद्र आव्हाड यांची शरद पवारांसोबतची भेट अत्यंत महत्त्वाची अशासाठी मनाली जाते कारण त्यांच्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय.  

जर एकनाथ खडसे यांच्यासारखा मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असेल तर त्यांना पक्षात मोठी जबाबदारी देखील दिली जाऊ शकते. एकनाथ खडसे यांना जर मंत्रिपद द्यायचं झालं तर ते कुठलं असेल यावर देखील अनेकांच्या चर्चा सुरु आहेत. जितेंद्र आव्हाड यांचं मंत्रिपद एकनाथ खडसे यांना दिलं जाणार असल्याची चर्चा आहे, त्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांचं मंत्रिपदावर नाथाभाऊंची वर्णी लागेल असं बोललं जातंय

गेल्या काही दिवसांपासून आव्हाड कोणत्याही चर्चेत नव्हते. मात्र आता ऐन प्रवेशाआधी जितेंद्र आव्हाड हे शरद पवरांच्या भेटीला गेलेले पाहायला मिळतायत. 

jitendra awhad went to meet sharad pawar at y b chavan center before eknath khadses official joining NCP


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jitendra awhad went to meet sharad pawar at y b chavan center before eknath khadses official joining NCP