जबरदस्त मताधिक्याने जितेंद्र आव्हाड कळवा मुंब्रा मतदारसंघातून विजयी | Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 24 October 2019

कळवा मुंब्रा मतदार संघातील मतदार राजा पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांना पावलाय. पुन्हा एकदा, कळवा मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड यांना इथल्या नगरीकांनी निवडून  दिलंय . जितेंद्र आव्हाड यांचा प्रचंड मतांनी विजय झालाय. तब्बल 75,517 मतांच्या फरकाने जितेंद्र आव्हाड जिंकलेत. आव्हाड यांनी शिवसेनेच्या दीपली सय्य्द यांना पराभूत केलंय.   

शरद पवारा यांच्या अगदी नजीकचे असे जितेंद्र आव्हाड. अशातच शिवसेनेने अगदी शेवटच्या क्षणी एक ग्लॅमरस चेहरा म्हणून अभिमेत्री दिपाली सय्यद यांना उमेदवारी दिली होती. दरम्यान, कळवा मुंब्रा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जितेंद्र आव्हाड यांना पराभूत करण्यासाठी शिवसेनेने रचलेली खेळी निष्फळ ठरली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर रश्मी ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत दीपाली सय्यद यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक उपस्थित होते. यापूर्वी २०१४च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी अहमदनगर मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. सिनेसृष्टीत अनेक वर्ष काम करून दिपाली सय्यदने लोकांच्या मनात एक वेगळं चित्र निर्माण केलंय.  

जितेंद्र आव्हाड हे एक मुरलेले राजकारणी आहेत. कळवा मुंब्रा मतदारसंघात जीतेद्र आव्हाड यांनी अनेक वर्ष काम केलंय. त्यामुळे दिपाली सय्यद यांना टक्कर देण्यास आव्हाड सक्षम उमेदवार होते. अशात पुन्हा एकदा जितेंद्र  आव्हाड यांना मतदार राजाने साथ दिलीये.

WebTitle : jitendra awhad won from kalwa mumbra constetuency against deepali syed

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jitendra awhad won from kalwa mumbra constetuency against deepali syed