'संघर्षाचा विजय असो'! आरे वने आरक्षित झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांची सूचक प्रतिक्रीया

तुषार सोनवणे
Thursday, 3 September 2020

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून संघर्षाचा विजय असो अशी प्रतिक्रीया दिली आहे.

मुंबई - मुंबई महानगर परिसराच्या मध्ये वसलेले जंगल म्हणजेच मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान होय. या उद्यानाजवळची 600 एकर जागा वनांसाठी आरक्षित ठेवण्याचा महत्वपुर्ण निर्णय ठाकरे सरकारने काल घेतला. या निर्णयानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून संघर्षाचा विजय असो अशी प्रतिक्रीया दिली आहे.

प्लाझ्मादानासाठी महिलाही घेताहेत पुढाकार; अनेक महिलांनी व्यक्त केली प्लाझ्मादानाची इच्छा 

अनेक दिवसांपासून मुंबईतील महत्वांकाशी प्रकल्प म्हणजेच मेट्रो कारशेडसाठी असलेली प्रस्तावित जागा हजारो झाडांची कत्तल झाल्यामुळे वादग्रस्त ठरली होती. महाविकास आघाडीच्या सरकारकडे आरे तील मेट्रो   कारशेडचा प्रकल्प रद्द करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत संजय गाधी उद्यानाजवळील 600 एकर जागा वनांसाठी राखीव ठेवण्याचा महत्वपुर्ण निर्णय झाला. या निर्णयात वनांच्या परिसरातील अदिवासी तसेच इतर संबधित समुदायाचे हक्क कायम ठेवण्यात येणार आहे.

 

आरेतील जंगल वाचवण्यासंदर्भात मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी जे ट्वीट केले आहे त्यात ते म्हणतात की, मित्रहो..... आम्ही दिलेला शब्द जपला.... आरे चे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला अभिनंदन आपणा सर्वांचे  संघर्षाचा विजय असो

आरे जंगलातील काही भागात मेट्रो चे कारशेड प्रस्तावित होते. परंतु शिवसेना आणि पर्यावरण प्रेमींना याला विरोध केला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jitendra Awhads suggestive reaction after Aarey Forest was reserved