

The trust continues relief efforts by supplying cooked food to families affected by heavy rainfall and flooding.
Sakal
विरार : विरार येथील प्रसिद्ध जीवदानी देवी मंदिर हे भाविकांच्या श्रद्धेचा विषय आहे. याठिकाणी भाविक मोठ्या प्रमाणावर येत असतात. संस्थांच्या वतीने त्यांच्या साठी अनेक सुविधा उपलब्ध केलेल्या असल्या तरी नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या संस्थांच्या वतीने मोठ्या प्रमाणात नागरिकांना मदतीचा हात दिला जातो. गेल्या आठवडा भर वसई विरार मध्ये पाऊस सुरु असून ठिकठिकाणी पाणी भरले आहे. अनेकांच्या घरात पाणी गेल्याने त्यांच्या चुली पेटल्या नाहीत. यासाठी पुढाकार घेत जीवदानी मंदिर संस्थांतर्फे गेल्या तीन दिवसा पासून पुरात अडकलेल्या आणि पाणी घरात घुसलेल्या नागरिकांसाठी खिचडी आणि पुलावचे वाटप करण्यात येत आहे. आता पर्यंत संस्थान तर्फे ५० हजार नागरिकांना याचे वाटप करण्यात आले आहे.