

उल्हासनगर : प्रशासकीय कामकाजातील दोष शब्दबद्ध करण्यापूर्वी प्रशासनातील चांगल्या कामाची बाजू मांडून पत्रकारांनी सकारात्मक बातम्यांना अधिकाधिक स्थान द्यावे.तसेच पत्रकारांनी प्रशासनात घडणारे चांगले बदलही नागरिकांसमोर प्रकाशझोतात आणून आपण राहत असलेल्या शहराचे नावलौकिक करावे, असे मार्गदर्शन यशदाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.बबन जोगदंड यांनी उल्हासनगरातील पत्रकारांना केले.