'आता लोक आम्हाला मॅडमजी हाक मारतात'

हर्षदा परब
रविवार, 1 एप्रिल 2018

कधी कधी तर राग येतो टाळी वाजते पण निर्णयावर परिणाम होत नाही
​कायदा, न्याय समता आणि संयमाने निर्णय घेणं हे आता जमू लागलं आहे. काही लोक असे असतात की ते ना वकीलाचं ऐकत ना जजच ऐकत. बऱ्याचदा अशांना समजवावं लागतं. पण त्यानंतरही अनेकदा लोक ऐकत नाही. दिलेला निर्णय स्विकारत नाही शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा राग येतो कधी तर टाळी वाजते. पण निर्णयावर त्याचा परिणाम होत नाही होऊ देत नाही - जोयिता मोंडल 

मुंबई : लोकअदालतमुळे लोकांचा आमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. पण खरं सांगायचं तर आम्ही कायद्याकडे बघणं, समतोल साधत निर्णय घेणं शिकलो. आम्ही लोकअदालतमध्ये जज झालो आणि त्यानिमित्ताने तृतीय पंथी किंवा ट्रान्सजेंडरबाबत एक प्रकारची अॅडव्होकसी झाली. लोकअदालतच्या जज असलेल्या तीन हिजडा समुदायातील महिलांनी त्यांचा अनुभव सांगताना या बाबी अधोरेखित केल्या. 

अनाम प्रेम या संस्थेने ट्रान्स जेंडर आणि हिजडा समुदायाचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना सक्षम करणे यासाठी आयोजित केलेल्या मेल्याल देशातील 4 लोकअदालत जज उपस्थित होत्या. त्यापैकी भारतातील पहिली ट्रान्स जेंडर जज जोयिता मोंडल (पश्चिम बंगाल), नागपूरमधील लोकअदालत जज विद्या कांबळे आणि पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील डेबी आचार्य यांनी सकाळला विशेष मुलाखत दिली. 

सुरुवातीला एक ट्रान्स जेंडर जज म्हणून बसलेली बघणं लोकांसाठी वेगळं होतं. पण त्यानंतर लोकअदालतमध्ये आलेल्या केसेसमध्ये न्याय निवाडा करताना संतुलित निर्णय घेतला. चांगल्या शब्दात समज दिली. परिणामी आता बरोबरचे जज देखील निर्णय घेताना निर्णय जाहीर करण्याची जबाबाबदारी माझ्यावर सोपवतात असे जोयिता सांगते. लोणच्याचा व्यवसाय करणारी जॉयिता हिला जेव्हा लोक अदालतचे जज केले तेव्हा लोकांनी भुवया उंचावल्या. त्यानंतर कोर्टात जजच्या जागेवर बसल्याने लोकांचा हिजडा म्हणून माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला असे जोयिता सांगते. सुरुवातील वळूनही न बघणारे लोकअदालतमध्ये येणारे आणि आजूबाजूला राहणारे आता मॅडमजी बोलू लागलेत. 

तर नागपूरची विद्या कांबळे सांगते सुरुवातील बिचकणाऱ्या महिलांना आता सुरक्षित वाटतं. पण निर्णय घेताना पुरुष, स्त्रिया असा भेद करत नाही असे विद्या सांगते. कायदा संविधान सर्वांसाठी समान आहे. जीआर निघाला म्हणून जज होता आलं. जज म्हणून लोकअदालतचं काम बघताना कायदा शिकता आला.

कायद्याचा अभ्यास करायचा होता. मात्र, वडीलांनी सोडल्यावर आईने मेहनत करुन शिक्षण दिलं. तेव्हा डिग्रीपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. मात्र, लोकअदालत ने कायद्याची ओळख करुन दिली. कायदा समजून घेण्याची संधी दिली असं मालदा जिल्ह्यातील लोकअदालत मध्ये नेमलेली जज डेबी आचार्य हिने सांगितले.  

कधी कधी तर राग येतो टाळी वाजते पण निर्णयावर परिणाम होत नाही
कायदा, न्याय समता आणि संयमाने निर्णय घेणं हे आता जमू लागलं आहे. काही लोक असे असतात की ते ना वकीलाचं ऐकत ना जजच ऐकत. बऱ्याचदा अशांना समजवावं लागतं. पण त्यानंतरही अनेकदा लोक ऐकत नाही. दिलेला निर्णय स्विकारत नाही शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा राग येतो कधी तर टाळी वाजते. पण निर्णयावर त्याचा परिणाम होत नाही होऊ देत नाही - जोयिता मोंडल 

Web Title: judge jotiya mandal story