सुशांत आत्महत्येप्रकरणी मीडिया ट्रायलविरोधातील याचिकांवर सोमवारी निकाल

सुनिता महामुणकर
Friday, 15 January 2021

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू झालेल्या मीडिया ट्रायल विरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर येत्या सोमवारी (ता. 18) मुंबई उच्च न्यायालय निकालपत्र जाहीर करणार आहे.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात सुरू झालेल्या मीडिया ट्रायल विरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकांवर येत्या सोमवारी (ता. 18) मुंबई उच्च न्यायालय निकालपत्र जाहीर करणार आहे. निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांसह वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात याबाबत याचिका केली आहे. सामाजिक संस्थेसह अन्य एक याचिकाही या प्रकरणात करण्यात आली आहे. 

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचे वार्तांकन करताना काही वृत्तवाहिन्या बेजबाबदारपणे आणि पोलिस तपासात हस्तक्षेप करणारे भडक वार्तांकन करीत आहेत, असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. वृत्तवाहिन्यांवर मार्गदर्शक तत्त्वे लावण्याची आणि त्यांच्यावर सरकारने अंकुश ठेवण्याची गरज आहे, असे याचिकादारांचे म्हणणे आहे. माध्यमांसाठी पुरेशी मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नव्याने तयार करण्याची आवश्‍यकता नाही, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आमच्यावर अंकुश नको, अशी माध्यमांची भूमिका आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

Judgment on the petition against the media trial in Sushants suicide case on Monday

-------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Judgment on the petition against the media trial in Sushants suicide case on Monday