मुंबई पालिकेविरोधात कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी निकाल

मुंबई पालिकेविरोधात कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी निकाल

मुंबई: अभिनेत्री कंगना राणावतच्या घरातील अनधिकृत बांधकाम  प्रकरणावरील निकाल मुंबई उच्च न्यायालय शुक्रवारी म्हणजेच येत्या २७ नोव्हेंबरला जाहीर करणार आहे.

मुंबई महापालिकेने कंगनाच्या पाली हिल येथील बंगल्यातील कथित अनधिकृत बांधकामावर पाडकामाची कारवाई केली आहे. याविरोधात तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. या याचिकेत तिनं दोन कोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पालिकेनं आकसाने वैध बांधकाम पाडले, असा दावा तिनं याचिकेत केलाय. मात्र महापालिकेच्या युक्तिवादात बांधकाम कारवाई नियमानुसार असल्याचे सांगितले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही तिने व्यक्तिगत आरोप केले आहेत. मात्र या आरोपांचे खंडन राऊत यांनी केले आहे.

याचिकेवर न्या शाहरुख काथावाला आणि न्या रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालय संकेतस्थळावर आधी निकालाची 26 नोव्हेंबर देण्यात आली होती. मात्र आता 27 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल, असे सूचित केले आहे.

पुन्हा अभिनेत्रीची उच्च न्यायालयात धाव

मुंबई पोलिसांनी दाखल केलेला राष्ट्रद्रोहाचा गुन्हा रद्द करण्यासाठी कंगना राणावतने मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल केली.

वांद्रे न्यायालयाने दिलेल्या निर्देशावरुन वांद्रे पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोली चंडेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिस आणि राज्य सरकार विरोधात त्यांनी केलेल्या ट्विटस विरोधात वकिल मुनावरअली सय्यद यांनी कंगना आणि तिच्या बहिणीविरोधात न्यायालयात तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने तिच्या विरोधात एफआयआर नोंदविण्याचे आणि चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. आतापर्यंत तीन वेळा तिला मुंबई पोलिसांनी समन्स बजावले होते. मात्र दोघींनीही चौकशीला हजेरी लावली नाही.

सोमवारी एड रिझवान सिद्दीकी यांच्या मार्फत तिनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणी बरोबरच पोलिसांनी बजावलेल्या समन्सला स्थगिती द्यावी आणि त्यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करण्यास पोलिसांना मनाई करावी, अशी मागणी केली आहे.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Judgment petition filed by Kangana against Mumbai Municipal Corporation Friday

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com