जुलैपासून हिंदमाता परिसरात पाणी नाही साचणार कारण...

...म्हणून पालिका आयुक्तांना विश्वास
 सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार (Raining) पाऊस पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे दादर हिंदमाता या परिसरात पाणी साचलं आहे.
सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार (Raining) पाऊस पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे दादर हिंदमाता या परिसरात पाणी साचलं आहे. अनिश पाटील

मुंबई: मुंबईत दरवर्षी थोडाजरी जास्त पाऊस झाला, तर परेल जवळच्या हिंदमाता भागात (hindmata area water logging) पाणी साचते. थोड्या पावसानेही इथे गुडघाभर पाणी साचते. वृत्तवाहिन्यांवरुन वारंवार ही दृश्य दाखवून पालिकेच्या दाव्यांची पोलखोल केली जाते. या भागात पाणी साचू नये, यासाठी पालिकेकडून वेळोवेळी उपायोजना केल्या आहेत. पण अद्यापपर्यंत त्याचा उपयोग झालेला नाही. आज पहिल्याच पावसाने मुंबईची दाणादाण उडवून दिली. नेहमीप्रमाणे सखल भाग असलेल्या हिंदमाता परिसरात पाणी साचले होते. स्वत: पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (iqbal singh chahal) यांनी इथे येऊन पाहणी केली. हिंदमाता भागात पाणी साचू नये, यासाठी एका प्रकल्पावर काम सुरु आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये इथे पाणी साचणार नाही, असा विश्वास चहल यांनी व्यक्त केला. (july onwards water logging problem at hindmata area will be solved bmc commissioner iqbal singh chahal confidance)

काय म्हणाले चहल?

"हिंदमाता परिसरात पाणी साचते, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी मला कल्पना दिली होती. दरवर्षी पावसाळ्यात इथे दोन ते तीन फुट पाणी साचते. त्यामुळे वाहतूक बंद होते. ज्याचा परिणाम इर्स्टन एक्स्प्रेस हाय वे पर्यंत होतो. नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे आम्ही इथे चार फूट उंचीचे सिमेंट-काँक्रीटचे रॅम तयार केले. चार महिन्यात हे काम पूर्ण केले. २४ तासात ६५ मीमी पाऊस कोसळला, तर आपण अतिवृष्टी मानतो. इथे तासाभरात ६० मीमी पाऊस झाला, तरी सुद्धा वाहतूक खोळंबली नाही. हे एलिव्हेटेड रॅम्पमुळे शक्य झाले" असे त्यांनी सांगितले.

 सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार (Raining) पाऊस पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे दादर हिंदमाता या परिसरात पाणी साचलं आहे.
"मुंबईत जिथे कधीच पाणी तुंबायचं नाही तिथेही आज पाणी साचलंय"

दुसरा मुद्दा पाणी साचण्याचा आणि नागरिकांच्या गैरसोयीचा आहे. "हिंदमाता भागात पाणी साचू नये, यासाठी आम्ही १४० कोटींचा प्रकल्प होती घेतला. सेंट झेवियर्स ते स्वर्गीय प्रमोद महाजन उद्यान इथे टाक्या बांधल्या. चार महिन्यात १४० कोटींचे काम केले. इथून दीड किमी अंतर आहे. रेल्वे लाईन होती. तिथे भूमिगत पाईपलाइन टाकण्यासाठी एनओसी मिळाली. परंतु केंद्राच्या मालकीच्या टाटा मिल्स खालून पाईपलाइन टाकण्यासाठी परवानगी मिळत नव्हती."

 सुरूवातीला पावसाचा जोर कमी होता पण नंतर मुसळधार (Raining) पाऊस पडण्यास सुरूवात झाली. त्यामुळे दादर हिंदमाता या परिसरात पाणी साचलं आहे.
चार तासाहून जास्त वेळ पाणी थांबलं नाही - मुंबई महापौर

"त्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मोठया टाक्या बांधल्या पण पाईपलाइन नसेल, तर पाणी वळवू शकत नाही. अखेर ३१ मे रोजी परवानगी मिळाली. दोन जूनपासून पाईपलाईन टाकण्याचं काम सुरु केलं. ते येत्या २५ जूनपर्यंत ते पूर्ण होईल. पुढच्यावेळी जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत पंपिंग करुन पाणी भूमिगत टाक्यांमध्ये वळवू ते साचू देणार नाही" असा निर्धार पालिका आयुक्तांनी व्यक्त केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com