मुंबई : CAA विरोधातील रॅलीत सहभागी होण्यासाठी आलेल्या डॉक्टरला अटक

Kafeel Khan
Kafeel Khan

मुंबई : अलिगड मुस्लिम विद्यापीठात चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप असलेला मुळचे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचा असलेला डॉ. काफिल खान याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबई विमानतळाहून अटक केली आहे.

केंद्र सरकारने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला (सीएए) विरोध म्हणून दिल्लीतील शाहीन बाग येथे सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही नागपाडा भागात महिलांनी आंदोलन सुरु केले आहे. मुंबईतील या आंदोलनातील आंदोलनकर्त्यांना मार्गदर्शन कऱण्यासाठी काफील खान बुधवारी रात्री मुंबईत दाखल झाला. मात्र, उत्तर प्रदेशच्या विशेष तपास पथकाने त्याला विमानतळावरूनच अटक केली.

सध्या त्याला मुंबईतील सहार पोलिस ठाण्यात ठेवले असून, त्याच्यावर 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीएएविरोधात 12 डिसेंबरला अलिगड मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चात काफील खान याने चिथावणीखोर भाषण दिल्याचा आरोप आहे. गोरखपूरच्या सरकारी रुग्णालयात लहान मुलांचा मृत्यू झाल्यानंतर केलेल्या वक्तव्यांमुळे काफील खान हा चर्चेत आला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com