पत्नी आणि दोन मुलांना मागे ठेऊन कैलास यांनी स्टेशन ऑफिसमध्येच स्वतःला संपवलं, मन स्तब्द करणारी घटना

पत्नी आणि दोन मुलांना मागे ठेऊन कैलास यांनी स्टेशन ऑफिसमध्येच स्वतःला संपवलं, मन स्तब्द करणारी घटना

मुंबई : मुंबईमध्ये कधी काय होईल कुणालाच सांगता येणार नाही. मुंबई एक असं शहर आहे जे शहर कुणालाही रिकाम्या पोटी झोपू देत नाही. मात्र या शहरात नागरिकांवर कामाचाही प्रचंड ताण आहे. प्रचंड स्पर्धा असल्याने प्रत्येकजण कामाच्या वजनाखाली दबलेला आहे. कामाच्या टेन्शनमुळे, घरच्या प्रेशरमुळे कोण कधी काय करून घेईल काही सांगता येत नाही.

नुकतीच मुंबईतील विद्याविहार रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडलीये. मुंबईतील सेंट्रल लाईनवर विद्याविहार हे स्थानक आहे. या स्थानकात आपल्याच ऑफिसमध्ये एका रेल्वे अधिकाऱ्याने आत्महत्या करत स्वतःचं जीवन संपवलं आहे. सदर घटना कालची आहे. सदर व्यक्तीची ओळख पटली असून या व्यक्तीचे नाव कैलास कदम असं आहे. कैलास विद्याविहार स्थानकात चीफ बुकिंग सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. 

नक्की घडलं काय ?

कैलास हे कल्याणमध्ये राहणारे. दररोजप्रमाणे सकाळी ते आपल्या घरून कामासाठी निघालेत. ऑफिसमध्ये पोहोचल्यावर त्यांनी एक कप चहा देखील घेतला. त्यानंतर त्यांनी आपल्या ऑफिसचा दरवाजा आतून कडी  लावून बंद केला. बराच वेळ दरवाजा उघड नसल्याने ऑफिसमधील एका सहकार्याने दरवाजा उघडला तेंव्हा कैलास यांनी स्वतःला गळफास लावून आत्महत्या केल्याचं आढळून आलं. कैलास यांनी वायरच्या साहाय्याने आत्महत्या केल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचलेत आणि कैलास यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केलं गेलं. तिथं त्यांच्यावरऑटोप्सी करण्यात आली. दरम्यान, कैलास यांनी नक्की कोणत्या कारणावरून आत्महत्या केली याबाबत अद्याप काहीही माहिती समजू शकलेली नाही. कैलास यांच्यामागे त्यांची पत्नी आणि त्यांची दोन मुलं आहेत. 

कैलास कदम यांनी नुकतंच एक कर्ज घेतलं होतं. कर्जाच्या कारणामुळे कैलास यांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज पोलिस व्यक्त करतायत. 

kailas kadam employee of central railway took extreme step and finished himself in hi office

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com