शस्त्रक्रियेनंतर शेतकरी गावित घरी परतले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 मार्च 2018

कळवा - किसान मोर्चासाठी नाशिकहून मुंबईत चालत आलेले मोर्चातील सहभागी शेतकरी अमृत गावित यांच्यासह अन्य पाच जणांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले होते. गावित यांच्या पोटात "अल्सर'ची गाठ फुटून पोटात स्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्‍यक होते. त्यानुसार कुटुंबीयांशी चर्चा करून डॉक्‍टरांनी शस्त्रक्रिया केली.

त्यांच्यावर रुग्णालय अधिकारी डॉ. संध्या खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली औषधोपचार करण्यात आले. गावित यांची प्रकृती सुधारल्यावर त्यांना गुरुवारी (ता. 22) घरी सोडण्यात आले. रुग्णालय प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल गावित यांनी डॉक्‍टरांचे आणि प्रशासनाचे आभार व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kalawa mumbai news kisan morcha farmer amrut gavit surgery