
डोंबिवली : कल्याण शीळ रोडवरील खड्ड्याने एका 28 वर्षीय तरुणाचा जीव घेतला आहे. रोहन शिंगरे असे या मुलाचे नाव असून कल्याण मधील रामबाग परिसरात तो राहत होता. 23 जुलैला रोहन हा कामावर जात असताना पिंपळेश्वर हॉटेल जवळील खड्डा त्याला दिसला नाही. या खड्डयात तोल गेल्याने त्याची गाडी पडली आणि पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकात त्याचा हात अडकला. ट्रकने काही अंतर त्याला फरफटत नेले. नागरिकांनी त्वरीत जखमी रोहनला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून त्याला सानपाडा येथे हलविण्यात आले. 21 दिवस मृत्यूशी झुंज देत होता. मात्र ही झुंज अपयशी ठरली असून अखेर अखेर 15 ऑगस्टला त्याचे निधन झाले. रोहन हा ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचा एकुलता एक मुलगा होता.