Kalyan News : कल्याणमधील उंबर्डे गावात हळदीत रिव्हाॅल्व्हर घेऊन नाचणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्या विरुध्द गुन्हा

BJP Leader : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात हळदी समारंभात बेकायदेशीर शस्त्र प्रदर्शन प्रकरणी भाजप ओबीसी सेलचे उपाध्यक्ष चिंतामण लोखंडे व त्यांचा भाऊ शरद लोखंडे यांच्यावर खडकपाडा पोलिसांनी शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.
Kalyan News
Kalyan NewsSakal
Updated on

डोंबिवली : कल्याण पश्चिमेतील उंबर्डे गावात हळदी समारंभात स्वसंरक्षणासाठी असलेले रिव्हाॅल्व्हर काढून हातात नाचवत, शस्त्राचे प्रदर्शन करत बिनदिक्कत व्हराडींमध्ये नाचणाऱ्या रिव्हाॅल्व्हरधारक चिंतामण लोखंडे आणि त्यांचा भाऊ शरद लोखंडे यांच्या विरुध्द खडकपाडा पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्याने गुन्हा शनिवारी रात्री दाखल केला. लोखंडे हे भाजप ओबीसी सेलचे उपाध्यक्ष असून, ते व्यावसायिक आहेत. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल केल्याची माहिती दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com