
डोंबिवली : कोरोना काळात ऑनलाईन शिक्षण असताना नववीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीची इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका तरुणाशी मैत्री झाली. या तरुणाने आई आजारी असल्याचे भासवुन मुलीकडून काही पैसे घेतले आणि नंतर इंस्टाग्रामवर अश्लील फोटो पाठवत तिला हळू हळू ब्लॅकमेल करायला लागला.