अट्टल हल्लेखोरास अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalyan CID

अट्टल हल्लेखोरास अटक; कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई

डोंबिवली : विठ्ठलवाडी (vithhalwadi) येथे बहिणीकडे आलेल्या किशोर सावरे (kishor saware) यांना दोन व्यक्तींनी लोखंडी पाईपने जबर मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली होती. याप्रकरणी दोन जणांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात (kolasewadi police station) दाखल गुन्ह्यांचा तपास कल्याण गुन्हे शाखा घटक 3 चे पथक करीत होते. यातील एका आरोपी किरण जाधव (kiran jadhav) (वय 30) यास कल्याण रेल्वे स्थानकातून गुन्हे शाखेने अटक (culprit arrested) केली आहे. तपासात 8 गुन्ह्याची उकल झाली असून आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

हेही वाचा: पालिका निवडणुकीसाठी राजकीय बैठका?

वांगणी येथे राहणारे किशोर सावरे हे सोमवारी वांगणी वरून विठ्ठलवाडी येथे बहिणीकडे आले होते. रेल्वे स्थानकाजवळील पार्किंग परिसरातून जात असताना दोन जणांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. लोखंडी रॉड ने त्यांना जबर मारहाण करण्यात आली होती. त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

कल्याण गुन्हे शाखा घटक 3 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सखोल माहिती काढली असता कोपर स्टेशन जवळ साई सिद्धी झोपडपट्टी मध्ये संशयित किरण रहात असल्याची माहिती मिळाली. त्याचा शोध घेतला असता कल्याण स्टेशन परिसरातून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे चौकशी केली असता कल्याण डोंबिवलीत दाखल 8 गुन्ह्यांचा उलगडा झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीस कोळसेवाडी पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून यातील आणखी एका आरोपीचा शोध सुरू आहे.

loading image
go to top