भटकी कुत्र्यांची दहशत कायम, गेल्या 6 महिन्यात प्रतिदिन 23 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

भटकी कुत्र्यांची दहशत कायम, गेल्या 6 महिन्यात प्रतिदिन 23 जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

मुंबईः  कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च अखेरीस लॉकडाऊन सुरू झाले आहे. याकाळात बहुतांश ठिकाणी कडकडीत बंद असताना भटकी कुत्र्यांची दहशत कायम राहिली आहे. गेल्या 6 महिन्यात प्रतिदिन 23 जणांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे समोर आले आहे. चक्क पालिका मुख्यालयात भटकी कुत्र्यांनी ताबा घेतला असून पालिका प्रशासन काय करते असा सवाल केला जात आहे.

कल्याण डोंबिवली शहरात दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत असताना अनेक नागरी समस्या वाढत असताना त्यात भटकी कुत्र्यांचा हैदोस हा प्रश्न गहन होत चालला आहे.  शहरातील डंपिंग ग्राऊंड, पालिका मुख्यालय, चिकन विक्रेता दुकान, नागरी वस्तीमध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर आणि दहशत वाढली आहे. 

दरम्यान 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2019 मधील आकडेवारी मार्च -1808 , एप्रिल - 1717 , मे - 1181 , जून - 973 , जुलै - 1058 , ऑगस्ट 1043 असे एकूण 6 महिन्यात 7 हजार 708 जणांना कुत्र्यांनी चावा घेतला. आकडेवारी पाहता प्रति दिन 42 जणांना भटकी कुत्र्यांनी चावा घेतला.

कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने मार्च 2020 मध्ये लॉकडाऊन सुरू झाले. याकाळात कल्याण डोंबिवली शहरात बहुतांश भागात कडकडीत बंद असताना भटकी कुत्र्यांनी नागरिकानां चावा घेतल्याचे समोर आले आहे.

1 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 मधील आकडेवारी मार्च - 1452 , एप्रिल - 658 , मे - 619 , जून -550 , जुलै - 491 , ऑगस्ट - 476 असे एकूण 4 हजार 246 जणांना भटकी कुत्र्यांनी चावा घेतला आहे. 6 महिन्याची आकडेवारी पाहता सरासरी प्रतिदिन 23 जणांना भटकी कुत्र्यांनी चावा घेतले असल्याचे समोर आले आहे.

शहरात भटकी कुत्र्यांची दहशत असताना जेथून पालिकेचा कारभार चालतो त्या पालिका मुख्यालय मध्ये भटकी कुत्र्यांनी ताबा घेतला असून अनेक कार्यालय बाहेर असलेल्या खुर्चीवर कुत्र्यांनी ताबा घेतला असून सुरक्षायंत्रणा करते काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना च्या कामात सर्व व्यस्त असल्याने याविषयावर सध्या तरी पालिका अधिकारी वर्गाने मौन धारण केले आहे.

----------------

(संपादनः पूजा विचारे) 

Kalyan Dombivali 23 people being bitten by stray dogs every day in last 6 months

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com