
2011 ते 2016 या कालावधीतील भविष्य निर्वाह निधीच्या रकमेपोटी 110 कोटी रुपयांच्या भरणा कल्याण-डोंबिवली पालिकेला करावयाचा आहे.
मुंबईः कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या बँक खात्यांवर संक्रांत आली आहे. 2011 ते 2016 दरम्यान पालिकेकडे काम करणाऱ्या ठेकेदारांकडील कामगारांचा भविष्य निर्वाह निधी न भरल्याने संबंधित विभागाने कल्याण-डोंबिवली सह ठाणे, भिवंडी निजामपूर तसेच उल्हासनगर महानगरपालिकांवर कारवाई केली आहे. दरम्यान या कारवाईवर कल्याण-डोंबिवली पालिकेने अपील केले असून संबंधित आदेशाला तात्पुरती स्थगिती मिळाली आहे. याप्रकरणातील पुढील सुनावणी 8 जानेवारीला होणार आहे.
2011 ते 2016 या कालावधीतील भविष्य निर्वाह निधीच्या रकमेपोटी 110 कोटी रुपयांच्या भरणा कल्याण-डोंबिवली पालिकेला करावयाचा आहे. ठाणे महानगरपालिकेला 400 कोटी रुपये भिवंडी-निजामपूर महापालिकेला 20 कोटी रुपये तर उल्हासनगर महानगरपालिकेला 40 कोटी रुपये दंड आकारण्यात आला आहे.
मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
पालिकेकडे काम करणाऱ्या मजूर संस्थांनी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम न भरल्याने पालिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. पालिकेसमवेत काम करणाऱ्या ठेकेदारांकडून कामगारांचा भविष्य निर्वाह निधी वेळेत भरला जातो अथवा नाही या देखरेखीसाठी 2014 मध्ये कल्याण-डोंबिवली महापालिकेला अधिकार देण्यात आले होते. पालिकेने 2014 ते 2016 या काळात याकडे कानाडोळा केल्याचे समजते. भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडून करण्यात आलेल्या या कारवाईनंतर पालिकेने ठेकेदारांची बिले रोखली आहेत, यामुळे ठेकेदारांमधे नाराजी आहे.
हेही वाचा- नव्या वर्षात रेल्वे प्रवाशांना एम. इंडिकेटर अँपवर मिळणार मराठीत माहिती
-----------------------
(संपादन- पूजा विचारे)
Kalyan Dombivali corporation 110 crore paid provident fund