esakal | KDMC चा मलशुद्धिकरण प्रकल्प रखडणार? 'NRC'मधील अद्ययावत गोदामासाठी बदलाचा प्रस्ताव
sakal

बोलून बातमी शोधा

KDMC चा मलशुद्धिकरण प्रकल्प रखडणार? 'NRC'मधील अद्ययावत गोदामासाठी बदलाचा प्रस्ताव

अदानी समूहाने सुचवलेला बदल आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने KDMC कडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी आहे. 

KDMC चा मलशुद्धिकरण प्रकल्प रखडणार? 'NRC'मधील अद्ययावत गोदामासाठी बदलाचा प्रस्ताव

sakal_logo
By
सुचिता करमारकर

कल्याण  : आंबिवली येथील "एनआरसी' कंपनीच्या जागेवर अदानी ग्रुप अद्ययावत गोदाम बांधण्याची तयारी करत आहे. न्यायालयाच्या सर्व प्रक्रिया पार पाडून या जागेवर काम सुरू असल्याची माहिती अदानी समुहाने दिली. दरम्यान या परिसरात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या कामात काहीसा बदल करून काम पुढे नेण्यास अदानी समुहाने सहकार्य दर्शवले आहे. मात्र समूहाने सुचवलेला बदल आर्थिकदृष्ट्या खर्चिक असल्याने पालिकेकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्‍यता कमी आहे. 

मोहोने, अंबिवली परिसरासाठी कोणत्याही प्रकारची भुयारी गटार योजना नसल्यामुळे त्या परिसरातील सांडपाणी नाल्यामध्ये सोडले जात होते. पुढे हाच नाला उल्हास नदीला मिळतो. उल्हास नदीमध्ये थेट सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी पालिकेने या परिसरासाठी भुयारी गटार योजना प्रस्तावित केली आहे. केंद्र सरकारच्या अमृत योजनेअंतर्गत यासाठी 300 कोटी रुपयांचा प्रकल्प आराखडाही तयार करण्यात आला होता. परंतु त्याला मंजुरी मिळाली नाही. सरकारने या परिसरातील सांडपाणी प्रक्रिया केंद्रासाठी आवश्‍यक असलेले पम्पिंग स्टेशन उभे केले जावे, अशी सूचना केली. त्यानुसार पालिकेने आराखडा तयार केला. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्या वाचा एका क्लिक वर

या मलशुद्धिकरण केंद्रांमध्ये नाल्यामधील पाणी पोहोचवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे एनआरसी कंपनी प्रशासनाशी पालिकेने यासंदर्भात बोलणी सुरू केली. पम्पिंग स्टेशनपर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी कारखान्यातील ज्या जागेची आवश्‍यकता आहे, ती प्रस्तावित जागा लिलावाद्वारे अदानी समूहाने विकत घेतल्यामुळे या योजनेचे नियोजन प्राधिकरण असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी समूहाच्या संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. परंतु अदानी समूहाने तयार केलेल्या त्यांच्या गोदामाच्या आराखड्यानुसार पालिकेच्या प्रस्तावित आराखड्यात बदल सुचवले आहेत. मात्र, यामुळे खर्चात वाढ होण्याची शक्‍यता असल्याने ही सूचना नाकारली जाण्याची शक्‍यता आहे. यामुळे पालिकेच्या प्रस्तावित मलशुद्धिकरण केंद्राच्या उभारणीला विलंब होण्याची शक्‍यता आहे. 

...यामुळे खर्चात वाढ 
अदानी समूहाने तयार केलेल्या त्यांच्या गोदामाच्या आराखड्यानुसार पालिकेच्या सांडपाण्यासाठीच्या प्रस्तावित आराखड्यात बदल सुचवले आहेत. या बदलानुसार पाणी वाहून नेणारी पाईपलाईन जेतवन नगर टेकडीवरून नेण्याबाबत सूचना केली आहे. परंतु पाणी टेकडीवर उचलण्यासाठी हायड्रोलिक पंपांचा वापर करावा लागणार आहे. या कामामुळे प्रकल्पाच्या प्रस्तावित खर्चात वाढ होणार आहे.

----------------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

kalyan dombivali marathi news KDMCs sewage treatment plant will be kept politics update