Kalyan Dombivali Municipal : डोंबिवलीत त्या ठिकाणी पाणी चोरी नाही; पालिकेचा खुलासा

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री डोंबिवलीतील संदप गावात अचानक धाड टाकत या ठिकाणी पाणी चोरी होत असल्याची बाब उघडकीस आणली.
kalyan dombivali municipal corporation
kalyan dombivali municipal corporationsakal
Summary

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री डोंबिवलीतील संदप गावात अचानक धाड टाकत या ठिकाणी पाणी चोरी होत असल्याची बाब उघडकीस आणली.

डोंबिवली - उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यरात्री डोंबिवलीतील संदप गावात अचानक धाड टाकत या ठिकाणी पाणी चोरी होत असल्याची बाब उघडकीस आणली. संदप रोड परिसरात दोन टॅंकर पॉईंन्ट व मिनरल वॉटर कारखान्यात पाणी चोरी होत असल्याचे सामंत यांना पाहणीत दिसून आले होते. मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर पालिका प्रशासनाने मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत याची चौकशी सुरु केली. पालिका प्रशासनाने संदप रोड परिसरातील तीन्ही ठिकाणची पाहणी मंगळवारी केली. या ठिकाणी पाईपलाईनवरुन पाणी चोरी होत नसून बोअरवेल मधील पाणी वापरले जात असल्याचा खुलासा पालिका अधिकाऱ्यांनी केला आहे. पालिकेच्या या खुलाशामुळे आश्चर्य व्यक्त होत असून या सर्व प्रकारावरच प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कल्याण डोंबिवलीतील 27 गावांत पाण्याची समस्या जटील असून येथील पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी उद्योगमंत्री सामंत यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर मंत्री सामंत यांनी अचानक डोंबिवली शहर गाठत सोमवारी मध्यरात्री संदप रोड परिसरातील पाईपलाईनची पहाणी केली. यावेळी मिनरल वॉटर कंपनी व अन्य तीन ठिकाणी टॅंकर द्वारे पाणी चोरी होत असल्याची बाब त्यांनी उघड केली. याप्रकरणी पालिका अधिकाऱ्यांची देखील सामंत यांनी कानउघडणी केली. त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांना खडबडून जाग आली. मानपाडा पोलिस ठाण्यात मिनरल वॉटर कंपनी चालक तसेच इतर दोन टॅंकर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे, प्रभाग अधिकारी भारत पवार व त्यांच्या पथकाने संदप रोड परिसरात पाणी चोरी होत आहे का याची पाहणी केली.

मिनरल वॉटर प्लान्ट या ठिकाणी पालिका अधिकाऱ्यांनी पाहणी केली. मात्र या ठिकाणी बोअरवेल मधून पाणी वापरले जात असल्याचे अधिकाऱ्यांना दिसून आले. बोअरवेलची त्यांनी परवानगी घेतली असून ती कागदपत्र संबंधित मालक पालिका प्रशासनास सादर करणार आहेत. तसेच संदप रोड परिसरातच इतर दोन टॅंकर पॉईंटच्या ठिकाणी पाहणी केली असता खदानी तसेच बोअरवेल मधून पाणी घेऊन त्यावर प्रक्रीया करुन टॅंकरमध्ये पाणी भरले जात असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

kalyan dombivali municipal corporation
Mumbai Crime : वाहतूक पोलिसाला भररस्त्यात मारहाण; Video होतोय Viral

उद्योगमंत्री सामंत यांची रात्रीच पडलेली धाड... पोलिस ठाण्यात तक्रार दाखल... त्यानंतर पालिका अधिकाऱ्यांचा खुलासा पाणी चोरी झालीच नाही. या सर्व प्रकारांमुळे उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे आलेल्या तक्रारीत काही तथ्य नव्हते का? याविषयी चर्चा होत आहे. त्यांच्या तक्रारीत तथ्य नव्हते तर मग सामंत यांनी रात्री पाणी चोरी होत असल्याचा दावा का केला? पालिका अधिकाऱ्यांना कसे काहीच आढळून आले नाही? असे अनेक प्रश्न या सर्व प्रकारावर उपस्थित केले जात आहेत.

तक्रारीनुसार संदप रोड परिसरातील तिन्ही ठिकाणची पाहणी करण्यात आली आहे. तिन्ही ठिकाणी पाणी चोरी होत असल्याची कोणतीही बाब निदर्शनास आलेली नाही. याचा अधिक तपास सुरु आहे.

- किरण वाघमारे, कार्यकारी अभियंता पाणी पुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com