कल्याण डोंबिवलीत घर घेताय? घर अधिकृत की अनधिकृत विचारा पालिकेला

कल्याण डोंबिवलीत घर घेताय? घर अधिकृत की अनधिकृत विचारा पालिकेला

मुंबई:  कल्याण डोंबिवलीतील वाढत्या अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बांधकाम म्हटले की नागरिकांना आधी प्रश्न पडतो बांधकाम अधिकृत आहे की अनधिकृत.  या बांधकामांवर अंकुश ठेवणे आता पालिका प्रशासनाच्या अवाक्याबाहेर गेले आहे. या बांधकामावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच ग्राहकांची फसवणूक होण्याआधीच त्यांना सतर्क करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने खास एक टोल फ्री क्रमांक तयार केला आहे. यावर कॉल केल्यानंतर ग्राहकांना आपण खरेदी करीत असलेले घर अधिकृत आहे की अनधिकृत याविषयीची माहिती जाणून घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी या क्रमांकावर संपर्क साधून रहात असलेले घर अधिकृत की अनधिकृत याची खात्री करुन घ्यावी असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत तसेच कल्याण ग्रामीण भाग, 27 गावांचा परिसर या भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी उभ्या राहिल्या आहेत. या चाळी तोडून नंतर तेथे सात मजली इमारती अनधिकृत उभ्या राहत आहेत. या बांधकामांवर अंकुश ठेवणे पालिका प्रशासनाच्या अवाक्याबाहेर गेले असून याला आळा घालण्यासाठी आता पालिका प्रशासनाने नामी शक्कल लढविली आहे. अनधिकृत बांधकामात घर घेऊन होणाऱ्या नागरिकांना नंतर मनस्ताप सहन करावा लागतो. नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेनं एक टोल फ्री क्रमांक जाहीर केलाय. 18002337295 हा तो क्रमांत असून या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून बांधकाम अधिकृत की अनधिकृत याबाबतची माहिती घ्यायचं आवाहन पालिका प्रशासनाने केलं आहे. या टोल फ्री क्रमांकास नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्यास अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी नागरिक घरेच घेणार नाहीत. परिणामी अशा बांधकामांना आळा बसेल असा विश्वास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

कल्याण डोंबिवली पालिका परिसरात अनेक अनधिकृत बांधकामे सुरु आहेत, यापूर्वी झालेली आहेत. नागरिकांना घर घेताना अनेकदा हे बांधकाम अधिकृत आहे की नाही, किती बांधकामास परवानगी मिळाली आहे याविषयीची माहिती नसते. त्यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांना अनेकदा मनस्तापाला सामोरे जावे लागते. त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर त्यांनी संपर्क साधून सर्व्हे नंबर सांगितल्यास त्या बांधकामाविषयीची माहिती त्यांना दिली जाईल. यामुळे त्यांची फसवणूक होणार नाही, तसेच याठिकाणी नागरिकांनी घर न घेतल्यास अशा बांधकामांनाही आळा बसेल. 
डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Kalyan Dombivali unauthorized constructions Municipal Corporation set up special toll free number 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com