Shivsena: "आता कसं वाटतंय बरं बरं वाटतंय" मनसेची बॅनरबाजीतून बोचरी टीका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalyan Dombivli MNS banner Criticism

Shivsena: "आता कसं वाटतंय बरं बरं वाटतंय" मनसेची बॅनरबाजीतून बोचरी टीका

डोंबिवली - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा महासंवाद दौरा सुरू आहे. शनिवारी कल्याण डोंबिवली मध्ये राजपुत्र अमित यांचे आगमन झाले असून त्यांच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीत चौका चौकात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली गेली आहे. काही बॅनर वर "आता कसं वाटतंय बरं बरं वाटतंय कारण पेराल तेच उगवणार" असे लिहिले असून हे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. शिवसेनेवर ही बोचरी टिका करण्यात आली आहे.

राजपुत्र अमित ठाकरे यांचे स्वागत करण्यासाठी तसेच कल्याण डोंबिवलीत मनसेची ताकद दाखवण्यासाठी मनसे कडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. बॅनरबाजी करत मनसेचे झेंडे लावण्यात आले आहेत. या बॅनरवर अमित ठाकरे यांचा फोटो असून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे फोटो देखील झळकले आहेत. तर काही बॅनरवर "आता कसं वाटतंय बरं बरं वाटतंय कारण पेराल तेच उगवणार" अशी टीका शिवसेनेवर या बॅनरच्या माध्यमातून केली आहे.

मनसेची ताकद काय असते हे शक्तीप्रदर्शन करून आम्ही दाखवू असं मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील म्हणाले आहेत. तर दुसरीकडे नागरिक देखील आनंद व्यक्त करत आहेत. अशा भेटीगाठी प्रत्येक नेत्यांनी केली पाहिजे. सध्या राज्यात राजकीय वातावरण तापत आहे. त्यात फक्त राजकीय घडामोडी सुरू आहेत त्यामुळे विद्यार्थी वर्गामध्ये मनस्ताप निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांसाठी कोणताही पक्ष समोर येत नाही किंवा चर्चा करत नाही विद्यार्थ्यांच्या समस्या सुटल्या जात नाहीत. अमित यांनी महासंपर्क संवाद दौरा सुरू केला असल्याने आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Web Title: Kalyan Dombivli Mns Banner Criticism Shiv Sena Latest Political News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top