डोंबिवली - एकाच दिवशी केडीएमसीचे तीन अधिकारी लाच स्विकारताना एबीसीच्या जाळ्यात सापडले आहेत. पालिकेचे घनकचरा विभागातील मुख्य स्वच्छता अधिकारी वसंत देगलूरकर आणि प्रभारी स्वछता अधिकारी सुदर्शन जाधव यांना 20 हजाराची लाच घेताना ठाणे लाचलूचपत विभागाने अटक केली आहे.