कल्याण : सराफा दुकान फोडणारा सराईत दरोडेखोर जेरबंद

महात्मा फुले चौक पोलिसांनी आंबिवली येथून केली अटक
Thief Arrested
Thief Arrestedsakal media

डोंबिवली : सराफाचे दुकान फोडून दरोडा टाकणे (robbery), खुनाचा प्रयत्न, सोनसाखळी चोरी असे गुन्हे करीत महाराष्ट्र राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या सराईत दरोडेखोरास महात्मा फुले चौक पोलिसांनी आंबिवली येथून अटक केली (culprit arrested) आहे. शिवासींग दुधानी (shivasingh dudhani) (वय 28) असे अटक आरोपीचे नाव असून तो पॅरोलवर बाहेर होता. पॅरोल रजेवर असतानाही त्याने साथीदारांसह 7 पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडे टाकले असल्याचे चौकशीत उघड झाले आहे.

Thief Arrested
दहावी निकालाचे संकेतस्थळ क्रॅश झाल्याचा अहवाल रखडला

कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या पूनम सिंग (वय 57) या सकाळी मॉर्निंग वॉक करीत असताना मोटारसायकल वरून जाणाऱ्या दोघा चोरांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पसार झाले होते. जून महिन्यात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल तांत्रिक बाबीवरून पोलीस आरोपीचा शोध घेत होते. तपासात आरोपी दुधानी हा सराईत गुन्हेगार असून 8 जून पासून तो पॅरोलच्या रजेवर आला असल्याचे समजले. त्यानुसार सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांच्या मार्गदर्शनावाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणजी घेटे यांच्या पथकाने आंबिवली रेल्वे परिसरात त्याचा शोध घेत त्याला अटक केली.

परोल रजेवर असताना दुधानी याने त्याच्या साथीदारासह 1) रसायनी पोलीस स्टेशन, रायगड 2) बडकी पोलीस स्टेशन, यवतमाळ 3) वडनेर पोलीस स्टेशन, वर्धा 4) मौदा पोलीस स्टेशन, नागपुर 5) जवाहरनगर पोलीस स्टेशन, भंडारा 6) साकोली पोलीस स्टेशन 7) लाखणी पोलीस स्टेशन भंडारा या ठिकाणी सराफा दुकाने फोडुन घरफोडी केली आहे. एकूण 11 गुन्हयात अटक करणे बाकी आहे. दुधानी याने साथीदारांसह मिळुन दरोडा टाकणे , दरोडयाची तयारी, खनाचा प्रयत्ल, सरकारी नोकरावर हल्ला, सोनसाखळी चोरी, मोटार सायकल चोरी अशा प्रकारचे 23 गुन्हे केले आहेत. महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल 4 गुन्हे उघड, आरोपीकडून 1 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त. अंबरनाथ, बदलापूर पोलीस ठाण्यातही गून्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com