कल्याण: नव्या पत्री पुलाच्या कामासाठी शनिवार, रविवार रात्री ट्रॅफिक ब्लॉक

प्रशांत कांबळे
Wednesday, 25 November 2020

कल्याणमधील नवीन पत्री पूल गर्डर लॉचिंगनंतर पुढील कामासाठी मध्य रेल्वेने दोन रात्र प्रत्येकी तीन तास असे एकूण 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमध्ये पुढील काम करण्यात येणार आहे.

मुंबईः कल्याणमधील नवीन पत्री पूल गर्डर लॉचिंगनंतर पुढील कामासाठी मध्य रेल्वेने दोन रात्र प्रत्येकी तीन तास असे एकूण 6 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमध्ये पुढील काम करण्यात येणार आहे.  पुलाशी संबंधित इतर कामासाठी यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे मध्य रेल्वे मुंबई विभाग रात्रीचा ट्रॅफिक आणिपॉवर ब्लॉकची घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मध्य रेल्वेने पत्रीपुलाच्या कामासाठी दोन रात्रीचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. 

असा असेल मेगाब्लॉक

27, 28 नोव्हेंबर रोजी रात्री त्यानंतर 28, 29 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री  2 ते 5 वाजेपर्यंत म्हणजेच तीन तास ब्लॉक घेण्यात येणार आहे.

27, 28 च्या मध्यरात्री ब्लॉक दरम्यानची कामे

 • डोंबिवली आणि कल्याण स्थानकांदरम्यान  मध्यरात्री  2 ते पहाटे 5 दरम्यान उपनगरी गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. 
 • ब्लॉक सुरू होण्यापूर्वी शेवटची डाऊन उपनगरी गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री 12.25 वाजता कर्जत करीता सुटेल.
 • ब्लॉक सुरू होण्यापूर्वी शेवटची अप उपनगरी गाडी कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता जाणारी रात्री 11.5 वाजता जलद मार्गावर आणि रात्री 11.52 वाजता धिम्या मार्गावर सुटेल.  तर 28 नोव्हेंबर रोजी रात्री 10.54 वाजता कल्याण येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाणारी जलद मार्गावरील शेवटची उपनगरी गाडी धावेल.
 • ब्लॉक संपल्यावर पहिली  डाऊन उपनगरी गाडी कुर्ला येथून पहाटे 4.51 वाजता  टिटवाळा करीता सुटेल. 
 • ब्लॉक संपल्यावर पहिली अप उपनगरी गाडी कल्याण येथून अप धिम्या मार्गावर पहाटे 5.3 वाजता आणि अप जलद मार्गावर पहाटे 5.4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करिता  सुटेल.

 मेल, एक्सप्रेसच्या मार्गात बदल 
28,29 नोव्हेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणा-या खालील अप मेल, एक्स्प्रेस गाड्या कर्जत - पनवेल -दिवा मार्गे वळविल्या जातील.  

 • गाडी  क्रमांक 01020 अप भुवनेश्वर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष. 
 • गाडी क्रमांक 02702 अप हैदराबाद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष.  
 • गाडी  क्रमांक 01140 अप गदग- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष.  
 • कल्याण येथील प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या कर्जत आणि दिवा स्थानकांवर थांबतील.

  
या मेल, एक्सप्रेस गाड्या उशिराने धावतील

मुंबईकडे येणाऱ्या खालील अप मेल, एक्स्प्रेस गाड्या 28,29 नोव्हेंबर रोजी ब्लॉकच्या कालावधीत नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

 • गाडी क्रमांक 01062 अप दरभंगा- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, एलटीटीला पहाटे 3.40 वाजता पोहचणारी गाडी टिटवाळा थांबेल.
 • गाडी क्र .02541 अप गोरखपूर- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, एलटीटीला पहाटे 4 वाजता पोहचणारी गाडीला खडवली येथे थांबवण्यात येणार.
 • गाडी ट्रेन क्रमांक 01016 अप गोरखपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस; एल.टी.टी. येथे पहाटे 4.20 वाजता पोहचणाऱ्या ट्रेनला वाशिंद येथे थांबवण्यात येणार आहे.
 • गाडी क्रमांक 02810 अप हावडा - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई विशेष,  सीएसएमटी स्थानकावर पहाटे 5.20 वाजता पोहचणाऱ्या ट्रेनला आटगाव येथे थांबवण्यात येईल.
 • गाडी क्रमांक 01142 अप किनवट - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष  सीएसएमटी येथे पहाटे 5.35 वाजता पोहचणारी ट्रेन खर्डी स्थानकावर थांबवण्यात येईल.
 • गाडी क्रमांक 07018 अप सिकंदराबाद - राजकोट विशेष,  कल्याण येथे पहाटे 4.45 वाजता पोहचणारी ट्रेन अंबरनाथ येथे थांबवण्यात येईल.

------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Kalyan Traffic block Saturday Sunday night for work on new Patripool bridge


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalyan Traffic block Saturday Sunday night for work on new Patripool bridge