कांदिवली : बोगस लस घेतलेल्या १५५ नागरिकांना दिली खरी लस

Corona Vaccine
Corona VaccineSakal media

मुंबई: कांदिवली पश्चिम (kandivali west) हिरानंदानी हेरिटेज (Hiranandani Heritage) मधील बोगस लस (Fake Vaccines) घेतलेल्या नागरिकांना पालिकेकडून (BMC) अखेर योग्य लस देण्यात आल्याने दिलासा मिळाला. महावीर नगर ऍमिनिटी मार्केट लसीकरण केंद्रामध्ये (Corona Vaccination center) पालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबविण्यात आली. एकूण 394 सदस्यांनी बोगस लस घेतली होती. शनिवारी सकाळी 9 ते 5 या वेळेत राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत 155 नागरिकांनी लाभ घेतल्याचे केंद्र व्यवस्थापक प्रमोद घाग (Pramod Ghag) यांनी सांगितले. ( Kandivali fake vaccines taken people gets authentic vaccines -nss91)

Corona Vaccine
अंडरवर्ल्ड डाॅन छोटा राजन विरोधात ७१ पैकी ४६ प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल

कांदिवली पश्चिम येथील हिरानंदानी हेरिटेज सोसायटीत 30 मे 2021 रोजी खाजगी रित्या लसीकरण मोहीम राबविण्यात आली.सदर लसीकरण बोगस असल्याचे निष्पन्न झाले होते.कांदिवली पोलीस ठाण्यात सर्वप्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता.सखोल तपासा नंतर डॉ मनीष त्रिपाठी,डॉ शिवराज पठारिया सह 6 जणांना अटक करण्यात आली.सखोल चौकशी नंतर इतर ठिकाणी झालेल्या बोगस लसीकरणाचा उलगडा झाला.हिरानंदानी मधील नागरिकांमध्ये बोगस लस घेतल्याने भीतीचे वातावरण होते.अखेर हाय कोर्टाने पालिकेला सूचना केल्याने बोगस लस घेतलेल्या नागरिकांना न्याय मिळाला. नागरिकांनी योग्य लस मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

''आमच्या मध्ये भीतीचे वातावरण होते.पण पालिकेच्या विशेष मोहीमेत योग्य लस मिळाल्याने रहिवाशांना फार मोठा दिलासा मिळाला.''

-गोपाळ सुरा, हिरानंदानी रहिवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com