'कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही'; गृहमंत्री अनिल देशमुखांची तीव्र प्रतिक्रीया

तुषार सोनवणे
Friday, 4 September 2020

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात वेळो वेळी व्यक्त होणारी अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर समाजमाध्यमांसह इतर सर्वच स्तरातून तीव्र टीका होत आहे

मुंबई - सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात वेळो वेळी व्यक्त होणारी अभिनेत्री कंगना रनौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर समाजमाध्यमांसह इतर सर्वच स्तरातून तीव्र टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच तीच्या व्यक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. असे म्हटले आहे.

कंगना रनौत म्हणाली, मी मुंबईत येतेय, कोणाच्या बापामध्ये हिंमत असेल तर.. - 

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सुशांतसिंह राजपूत प्रकरणात आपले मतं मांडणारी अभिनेत्री कंगणा रनौतने राज्य सरकार, मुंबई पोलिस आणि बॉलिवूडवर गंभीर टीका केली आहे. माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची मला भीती वाटते असे वक्तव्य केल्याने शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगणाला खडे बोल सुनावले होते, त्यांनी कंगनाला मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर इथून निघून जावं, असं म्हटलं होतं.

मी शिवसैनिक आहे...अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही; संजय राऊत संतापले

संजय राऊत यांच्या वक्तव्यांचा पुन्हा कांगावा उभा करत, राऊत मला मुंबईत न येण्याची खुले आम धमकी देत असून मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागल्याचे कंगणाने म्हटले.  या वक्तव्यामुळे बॉलिवूड पासून ते राजकारण्यांपर्यंत सर्वांनीच कंगणाला टीकेचे लक्ष केले आहे. मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांचाही पारा चढल्याचे सध्या दिसत आहे. ते या प्रकरणी प्रतिक्रीया देताना म्हणाले की, कंगनाने मुंबई पोलीसांची तुलना माफियांसोबत केली आहे.त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही."

--------------------------------------------------------

Kangana has no right to live in Mumbai; Home Minister Anil Deshmukhs strong reactio


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana has no right to live in Mumbai; Home Minister Anil Deshmukhs strong reactio