कंगनाने शरद पवार यांचे नाव घेताच, जितेंद्र आव्हाड भडकले, म्हटले की,...

तुषार सोनवणे
Thursday, 10 September 2020

कंगनाने आणखी एक ट्विट केले त्या ट्वीटमध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे खासदार शरद पवार यांचाही उल्लेख केला आहे. त्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे.

मुंबई - अभिनेत्री कंगना रानौतने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांनंतर तीच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी कडाडून टीका केली होती. काल कंगनाच्या घरावर मुंबई महानगर पालिकेने कारवाई केली. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण लागले. कंगनाने आणखी एक ट्विट केले त्या ट्वीटमध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे खासदार शरद पवार यांचाही उल्लेख केला आहे. त्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली आहे.

आता कंगनाच्या खार येथील घरी महापालिकेने नोटीस पाठवली आहे. ही नोटीस केळव आपल्यासाठी नसून संपूर्ण इमारतीसाठी होती. या नोटीसला बिल्डरनं सामोरे जाण्याची आवश्यकता असून, ती इमारत शरद पवारांशी संबधित आहे. आम्ही त्यांच्या सहकाऱ्याकडून घर विकत घेतलं. असं कंगनानं म्हटलं होतं. तसंच कंगनानं एक नोटीसही शेअर केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाच्या या ट्विटवर सडकून टीका केली आहे. परंतु त्यात त्यांनी कंगनाच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. ते म्हटले की, “शरद पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्र उभा केला आणि बांधला हे महाराष्ट्राला माहितीये. पण जिला महाराष्ट्राबद्दल काहीच माहित नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली,” तसंच कंगनाला मानसिक रोगी असंही आव्हाड यावेळी म्हणाले आहेत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana mentioned Sharad Pawars name, Jitendra Awhad erupted saying