कंगना राणावत विरोधात पालघरमध्ये तक्रार | Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

कंगना राणावत विरोधात पालघरमध्ये तक्रार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सफाळे : अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranaut) देशाच्या स्वातंत्र्याबद्दल (indian freedom) केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल (controversial statement) तिच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा (Sedition charges), अशी पालघर पोलिसांत (palghar police) पालघरमधील शिवसैनिकांनी (shivsena complaint) तक्रार केली आहे. कंगनाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या तसेच संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी वेचणाऱ्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा जाणून-बुजून व हेतूपुरस्सर अपमान केला.

हेही वाचा: 'न्यायालयाला धमकी देऊन न्याय मिळत नाही,संप मागे घ्या' - परब

तिच्यावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम ५०४ व ५०५ गुन्हा नोंदविण्यात यावा, तसेच योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार शिवसेना पालघर लोकसभा समन्वयक केदार काळे यांनी पालघरचे पोलिस निरीक्षक आर. ई. भालसिंग यांच्याकडे केली आहे.

यावेळी काळे यांच्यासोबत पालघर नगर परिषदेचे शिवसेनेचे गटनेते कैलास म्हात्रे, नगरसेविका व शहर संघटक अनुजा तरे, नगरसेवक रवींद्र म्हात्रे, नगरसेवक अमोल पाटील, नगरसेविका अ‍ॅड. प्रियंका म्हात्रे, नगरसेविका चेतना गायकवाड, माजी नगरसेवक संजय गायकवाड, माध्यमिक शिक्षक सेना अध्यक्ष नीलेश भोईर, उपशहर संघटक मोनिका गवळी, उपशहर संघटक ज्योती राऊत, उपसंघटक संगीता पाटील, कार्यालय प्रमुख रामदास गुप्ता, विभाग प्रमुख मुनाफ मेमन, रिक्षाचालक संघटना अध्यक्ष मनोज घरत, उपशहर प्रमुख संतोष दीक्षित, शिवसैनिक संजीव धोत्रे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते. अ‍ॅड. ओंकार कदम यांनी तक्रार देताना कायदेशीर काम पाहिले.

loading image
go to top