esakal | संजय राऊत यांचा ऑडिओ कोर्टात सादर; 'कंगनाचं नाव घेतलच नाही'
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut hearing sanjay raut audio presented bombay high court

कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केल्यानंतर संजय राऊत यांनी तिच्या विषयी वक्तव्य केले होते. त्यांनी आपमानस्पद शब्द वापरले, अशी तक्रार कंगनाने केलीय.

संजय राऊत यांचा ऑडिओ कोर्टात सादर; 'कंगनाचं नाव घेतलच नाही'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यातील वादा आता कोर्टात पोहोचलाय. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या वादावर सुनावणी झाली. त्यात खासदार संजय राऊत यांच्या विधानाचा ऑडिओ कोर्टात सादर करण्यात आला. त्यात कंगनाचा उल्लेख नसण्यावरून संजय राऊत यांच्या वतीने बाजू मांडण्यात आली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

काय घडले कोर्टात? 
पाली हिलमधील ऑफिसवर मुंबई महापालिकेने हातोडा टाकल्यानंतर अभिनेत्री कंगना राणावत हिने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यावर आज सुनावणी झाली. त्यात कंगना राणावत हिच्या ट्विटना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून कठोर आणि अपमानास्पद प्रतिसाद देण्यात आला, असा मुद्दा कंगनाच्या वकिलांनी कोर्टात मांडला. त्यावर कोर्टाने संजय राऊत यांच्या वक्तव्याचे ऑडिओ सादर करण्यास सांगितले. ते ऑडिओ प्ले केल्यानंतर संजय राऊत यांचे वकील प्रदीप थोरात यांनी त्याला आक्षेप घेतला. त्या ऑडिओमध्ये राऊत यांनी कंगनाचे नावच घेतले नसल्याचा मुद्दा वकील थोरात यांनी मांडला. त्यावर कोर्टाने 'तक्रारदार व्यक्तीचे नाव घेतले नाही ही तुमची (संजय राऊत यांची) बाजू झाली.' त्यावर थोरात यांनी उद्या प्रतिज्ञापत्र सादर करू, असे कोर्टात सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

'माझ्याकडून चूक होऊ शकते'
कंगनाने मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी केल्यानंतर संजय राऊत यांनी तिच्या विषयी वक्तव्य केले होते. त्यांनी आपमानस्पद शब्द वापरले, अशी तक्रार कंगनाने केलीय. संजय राऊत यांनी या वक्तव्यांविषयी माफी मागितील होती, असं एनडीटीव्हीनं त्यांच्या वृत्तात म्हटलंय. एनडीटीव्हीशी बोलताना राऊत यांनी 'माझ्याकडून चूक होऊ शकते.' असं म्हटलं होतं. मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या विरोधात कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलीय. पाली हिलच्या ऑफिसमध्ये कोणत्याही प्रकारचं नवीन काम सुरू नव्हतं. महापालिकेने खात्री करून न घेताच कारवाई केल्याचं मत कंगनाच्या वतीने वकिलांनी मांडलंय.