तर कंगना रानौतला व्हावे लागणार क्वारंटाईन! वाचा मुंबईच्या महापौरांची प्रतिक्रीया

समीर सुर्वे
Monday, 7 September 2020

कंगना राणौत मुंबईत आल्यावर तिला होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यासाठी तिच्या हातावर शिक्काही मारला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

मुंबई : कंगना राणौत मुंबईत आल्यावर तिला होम क्वारंटाईन व्हावे लागणार आहे. त्यासाठी तिच्या हातावर शिक्काही मारला जाईल, असे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

तारापूरात कारखान्यातून रसायनाची गळती, विषारी वायूमुळे महिलेसह 6 कामगारांना बाधा

कंगनाला केंद्र सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यामुळे कंगनाबरोबर सुरक्षेतील पोलिसही मुंबईत आल्यास त्यांच्याबाबत काय निर्णय घेण्यात येईल, हे अद्याप अस्पष्ट आहे. या आठवड्यात कंगना मुंबईत येणार आहे. परराज्यातून विमानाने येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावे लागते, असा नियमच आहे. तो कंगनालाही लागू आहे, असे महापौरांनी सांगितले.

ठाण्याच्या पोलिस आयुक्तांना कोरोना, मुंबईच्या खासगी रुग्णालयात दाखल - 

दरम्यान, मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकार विरोधात बदनामीकारक ट्विट  करणं अभिनेत्री कंगना राणावतला महागात पडलं आहे. कंगनाविरोधात गोरेगाव वनराई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कंगना राणावतनं जाणीवपूर्वक बेछूट टीका करणारे ट्विट केले. यात तिनं मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारची बदनामी केल्याचा आरोप करत आदित्य सरफरे या सामान्य मुंबईकरानं ही तक्रार दाखल केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranaut should be Lagavan Kavathata! Read the reaction of the Mayor of Mumbai

Tags
टॉपिकस