esakal | कंगनाच्या ऑफिस पाडकामाची सुनावणी पूर्ण; न्यायालयाने निर्णय ठेवला राखून
sakal

बोलून बातमी शोधा

कंगनाच्या ऑफिस पाडकामाची सुनावणी पूर्ण; न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

कंगनाच्या ऑफिस पाडकामाची सुनावणी पूर्ण; न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

sakal_logo
By
सुनिता महामुणकर

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतने केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. कंगनाने बंगल्यामध्ये नियमबाह्य काम केल्याचा दावा मुंबई महापालिकेने केला आहे तर महापालिकेनी केलेली पाडकामाची कारवाई अवैध असल्याचे कंगनाने म्हटले आहे.

महाराष्ट्रातल्या गुन्हेगारी संदर्भातली आकडेवारी समोर, NCRB ची माहिती

पाली हिल येथील बंगल्यात कंगनाने नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा आरोप महापालिकेच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत तातडीने पाडकामाची कारवाई देखील करण्यात आली आहे. या कारवाईला तिने उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. न्या शाहरुख काथावाला आणि न्या रियाज छागला यांच्या खंडपीठाने आज सर्व पक्षकारांना लेखी युक्तिवाद दाखल करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने विशेष वकील एस्पी चिनॉय, कंगनाच्या वतीने एड बिरेंद्र सराफ, महापालिकेच्या वतीने अनील साखरे आणि खासदार संजय राऊत यांच्या वतीने प्रदीप थोरात यांनी लेखी बाजू दाखल केली. खंडपीठाने त्यानंतर निकाल राखून ठेवल्याचे जाहीर केले. न्यायालयाने संयमाने सुनावणी घेतली यासाठी चिनौय यांनी खंडपीठाचे आभार मानले.

मुंबईच्या 7 खासगी रुग्णालयातील कोविड वॉर्ड हाऊसफुल,वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम

महापालिका कारवाई आकसाने करत आहे कारण सत्ताधारी पक्षाविरोधात जाहीर मते मांडली होती, असा युक्तिवाद कंगनाने केला आहे. तर कोणत्याही आकसाने कारवाई नसून नियमांचे पालन केले नाही म्हणून कारवाई आहे असे पालिकेचे म्हणणे आहे. राऊत यांनी मुलाखती मध्ये केलेल्या विधानावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे तर या पाडकामाचा माझ्याशी संबंध नाही, मुंबईबद्दल कंगनाने वादग्रस्त विधान केले त्यावर मुलाखतीमध्ये बोललो होतो, असा खुलासा राऊत यांनी केला आहे

--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )