कांजूरमार्ग कारशेडचा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करू नये, हवं तर श्रेय तुम्हाला देतो; मुख्यमंत्र्यांची विरोधकांना साद

कांजूरमार्ग कारशेडचा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करू नये, हवं तर श्रेय तुम्हाला देतो; मुख्यमंत्र्यांची विरोधकांना साद

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोनावर लस आली असली तरी नागरिकांनी मास्क वापरणं बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कोरोनापासून सुरक्षेसाठी नियम आपल्याला पाळावेच लागतील. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. केवळ एका लाईनसाठी आरे मध्ये कारशेड का? कांजुरची 40 हेक्टर जागा आहे, प्रश्न प्रतिष्ठेचा केला तर आपल्याला खुर्चीवर बसण्याचा अधिकार नाही. असे म्हणत त्यांनी कांजूरमार्ग येथील कारशेडच्या जागेच्या मुद्याचा उल्लेखही भाषणात केला.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी कोणते मुद्दे मांडले.

  1. संकटातही विकासकामे सुरु आहेत. आर्थिक चणचण आहे, केंद्राकडून पैसे येणे बाकी आहे. आर्थिक चणचण असली तरी आपण मार्ग काढत आहोत.
  2. मला अहंकारी संबोधले जाते... मी माझ्या महाराष्ट्रासाठी अहंकारी आहे. जे जनतेच्या हितासाठी, ते करण्याचा प्रयत्न करत आहे.
  3. अनेक अडचणींना आणि राजकीय हल्ल्यांना परतवत आपण एक वर्ष पूर्ण केलं आहे. अनेकजण डोळे लावून बसले होते. हे सरकार आता पडेल तेव्हा पडेल. परंतु जागतिक संकटातही आपण एक वर्ष पूर्ण केलं आहे. 
  4. लग्नसराई सुरू आहे. आपण असंख्य जणांना आमंत्रण देत  असतो. परंतु आमंत्रण आपण कोरोनाला तर देत नाही ना? याची सावधानता बाळगा. लग्नकार्यात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. 
  5. नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. परंतु धन्यवाद द्यायचे आहेत कारण बहुतांशी लोक सूचनाचे पालन करत आहेत. 70-75 टक्के लोक पालन करत आहेत परंतु उर्वरित लोकांमुळे हे खबरदारी घेणारे देखील धोक्यात. परदेशातुन येणार्‍या प्रवाशांच्या टेस्ट थांबवा असे लोक म्हणत आहेत, परंत कसं थांबवायचं? आपण धिम्या गतीने पुढे जात आहोत. सावधपणे पावले उचलत आहोत. अनुभवातुन आपल्याला शहाणपण आलेलं आहे.
  6. कोरोनाने आता रुप बदलले आहे. आर नॉट असे त्याला टेक्निकल भाषेत संबोधतात. काळासोबत बदला म्हणतात तसं व्हायरसने रुप बदललं आहे. युरोपमध्ये कडक लॉकडाऊन आजपासून का करावा लागला? त्याची कारणे आहेत. सण गेले परंतु आता न्यू ईअर येत आहे.
  7. केवळ एका लाईनसाठी आरे मध्ये कारशेड का? कांजुरची 40 हेक्टर जागा आहे, म्हणजे 25 आणि 40 असा फरक आहे. कांजुरचा गवताळ किंबहुना ओसाड जागा आहे. कांजुरला 3 - 4 - 6 या तीन लाईनसाठी आपण कारशेड करू शकतो.
  8. पावसापूर्वी पेरता पक्षी येतो आणि पेरणीची साद घालतो त्याचप्रमाणे प्रत्येक पावलावर मी तुम्हाला सावध रहा सांगत आलो आहे. कोविड सुरू झाला तेंव्हा भेटींची वारंवारता जास्त होती... मी आजपर्यंत जे काही सांगत आलो ते आपण मनापासून अंमलात आणत गेलात, त्यामुळे आपण नियंत्रण मिळवले आहे.
  9. देशाचे आरोग्यमंत्री हर्षवर्धनजींनी सांगितलं आहे की व्हॅक्सिन आली तरी मास्क लावावा लागेल. त्यामुळे माझ्या मते 6 महिने तरी मास्क लावावा लागेल.
  10. प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण केला तर आपल्याला खुर्चीत बसण्याचा अधिकार नाही. मी ज्या खुर्चीत बसलोय, त्या खुर्चीच महत्त्व मला माहित आहे. वैयक्तिक आवड-निवड ठेवत नाही, हट्टीपणा नाही, परंतु विकासकामांसाठी पाठपुरावा मी करणारच.

कांजूरमार्गवरून मुख्यमंत्र्यांची विरोधकांना साद

कांजूरमार्ग कारशेडचा सुरू असलेला वाद जनतेच्या हिताचा नाही. प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करू नये. हवं तर श्रेय तुम्हाला देतो. तुमची जागा आणि माझा जाग म्हणून प्रकल्पाची खेचाखेची करू नका, माझं विरोधी पक्षाला आवाहन आहे की, बसून चर्चा करू. आणि प्रश्न सोडवू. कांजूरमार्गवर मेट्रो कारशेड होणं योग्य आहे. पाच वर्षानंतर जेव्हा जनता आपल्याला विचारेल तेव्हा काय सांगाल. असे मुख्यमंत्री म्हणाले,

कांजूरमार्गच्या मुद्द्यावरून मला अहंकारी म्हटलं जाते. होय मी अहंकारी आहे माझ्या मुंबई साठी माझ्या महाराष्ट्रासाठी  आरेत मेट्रो तीनसाठी कारशेड करणार होतो. त्यासाठी 30 हेक्टर जागा घेतली जाणार होती. त्यातील पाच हेक्टर जागेवर झाडे असल्याने या जागेवरील झाडे कापणार नाही आणि ती वापरात घेणार नाही, असं आपण लिहून दिलं होतं. म्हणजे एकूण 25 हेक्टरवर कारशेड होणार होती. 2023मध्ये हे काम पूर्ण होणार होतं. त्यानंतर भविष्यात पुन्हा जागा कमी पडली असती तर झाडे कापणार होतो. झाडे कापून ती पाच हेक्टर जागा घेणार होतो. 2031 पर्यंत आणखी जागा कमी पडली असती तर आणखी घेणार होतो. एका लाईनसाठी जंगल मारत मारत जाणार होतो. त्यात एक मार्ग स्टब्लिंगसाठी करायचा होता. म्हणजे गाड्या पार्क करण्यासाठी जागा ठेवायची होती. पण या प्रस्तावात त्याचा उल्लेखच नव्हता. त्यामुळे आमच्या सरकारने आरेच्या टोकावर जिथं कास्टिंग यार्ड आहे, तिथे स्टेब्लिंग लाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असं सांगतानाच आपण आरेचं पर्यावरण वाचवलं असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्ती वाढवून 800 एकर केली आहे. जगातलं हे शहरात असलेलं सर्वात मोठं जंगल आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले

The Kanjurmarg car shed project should not be a matter of prestigesaid Chief Ministers udhav thackray

---------------------------------------------------------------

( संपादन -  तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com