esakal | कारशेडच्या निर्णयावर नाराजी; न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग, संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र
sakal

बोलून बातमी शोधा

कारशेडच्या निर्णयावर नाराजी; न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग, संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

न्यायालयानं कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिल्यामुळे ठाकरे सरकारला धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

कारशेडच्या निर्णयावर नाराजी; न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग, संजय राऊतांचं भाजपवर टीकास्त्र

sakal_logo
By
पूजा विचारे

मुंबईः  मुंबईतील कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेडच्या कामाला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायालयानं कारशेडचे काम थांबवण्याचे आदेश दिल्यामुळे ठाकरे सरकारला धक्का बसला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

ही जमिन महाराष्ट्राची, सरकार महाराष्ट्राचं, मग हे मिठागरवाले आले कुठून? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. तसंच 'कांजूरमार्गच्या जागेवर आधीच्या सरकारला गृहनिर्माण प्रकल्प राबवणार होते. पोलिसांची घरं बांधणारं होतं. मग आता काय झालं? विलंब करायचा, रोष निर्माण करायचा हा घाट कशाला?' असा थेट सवाल  संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. तसंच हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

मेट्रो कारशेडच्या कामाला थांबवण्याचा आदेश दिला आहे, तो दुर्दैवी आहे. याचा आम्ही विचारत आहोत.  पण कांजूरमार्गच्या जागेत नेते काही बंगले बांधणार नाहीत, हा निर्णय दुर्दैवी आहे. तसंच  बेकायदा बांधकाम तोडण्याबाबत सरकार कारवाई करत असेल तर ते चुकीचे, आणि जे चांगले काम करत आहे, तेही चुकीचे,  असं आम्ही कधी पाहिलं नाही अशी टीका राऊत यांनी केली.

अधिक वाचा-  मनसेकडून मुंबईभरात ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’चे पोस्टर

न्यायालयानं लक्ष घालण्यासारखे देशात अनेक विषय आहेत. शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढतं आहे. दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनाला बसले आहेत. पंजाबमध्ये एका शिख संतांनी आत्महत्या केली आहे. पण महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यामुळे असे निर्णय येत आहेत का? असा प्रश्न लोकांना पडत असल्याचं राऊतांनी म्हटलं आहे. अशाप्रकारच्या प्रकल्पाला विलंब होईल अशी परिस्थिती निर्माण करायची, लोकांमध्ये रोष निर्माण करायचा आणि सरकारला बदमान करायचं, हे काम सध्या सुरु असल्याची टीका राऊतांनी भाजपवर केली आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरेचं जंगल वाचवणं. आरेमधील अनेक जीव वाचवणं हे तर राष्ट्रीय कर्तव्य आहे. हा केंद्र सरकारचाच कार्यक्रम आहे. महाराष्ट्रात सरकार आलं नाही त्याचं दु:ख आम्ही समजू शकतो. पण अशाप्रकारे केंद्रीय यंत्रणा हाताशी धरुन महाराष्ट्राला, महाराष्ट्र सरकारला त्रास देणं फार काळ चालणार नसल्याच इशारा राऊतांनी भाजपला दिला आहे.

Kanjurmarg metro carshed high court Shivsena mp sanjay raut reaction bjp

loading image