कर्नाटकातील परिस्थिती मुंबईत; मुस्लिम महिलेला लोकलमध्ये बसण्यास नकार

Hijab Controversy
Hijab Controversysakal media

मुंबई : कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरून (Karnataka Hijab Controversy) देशभरात वादंग सुरू आहे. याचे पडसाद आता मुंबईतही (Mumbai) दिसत आहे. ‘हिजाब’ परिधान केल्याने एका मुस्लिम महिलेला (Muslim woman) लोकलमध्ये बसण्यास काही प्रवाशांनी नकार दिल्याचा प्रकार मंगळवारी (ता. १५) घडला. हा सर्व प्रकार संबंधित महिलेच्या पतीने ट्विटरवर शेअर केला. मुंबईतील लोकल प्रवास (Local train travelling) हा नेहमीच गर्दीचा असतो. अनेक वेळा तीन आसनांच्या बाकावर ‘थोडं सरका’ म्हणत चौथा प्रवासीही बसतो. लोकलमध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक उभ्याने प्रवास करत असल्यास त्यांना बसण्यास जागा दिली जाते.

Hijab Controversy
नवी मुंबई मेट्रो मार्च मध्ये धावणार ? नागरिकांमध्ये नाराजीचा सूर

मुंबईकरांचा हा नेहमीचा प्रघात; मात्र मंगळवारी हिजाब परिधान केलेल्या एका मुस्लिम महिलेला नालासोपारा- विरारदरम्यान लोकलमध्ये बसण्यासाठी जागा देण्यास काही प्रवाशांनी नकार दिला, उलट साडी नेसलेल्या महिलेला बसण्यास जागा देण्यात आली. याबाबत संबंधित महिलेचे पती डॉ. परवेझ मांडवीवाला यांनी ट्विट करत नाराजी व्यक्त केली. यावर अनेक युजर्संनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. दरम्यान, पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी या प्रकारावर ट्विट करून तीव्र नाराजी व्यक्त केली.

नेमकं काय घडलं?

डॉ. परवेझ मांडवीवाला म्हणाले की, ‘माझी पत्नी बाळासह लोकलने प्रवास करताना एका प्रवाशाने तिच्यासाठी जागा करून दिली; मात्र पत्नीने हिजाब परिधान केला असल्यामुळे बसण्यास काही प्रवाशांनी नकार दिला. त्याऐवजी साडी नेसलेल्या काही महिलांना बसण्याचा आग्रह केला. लोकलमध्ये घडलेल्या या प्रकाराचा मला आणि माझ्या पत्नीला धक्का बसला आहे. प्रवाशांची वर्तवणूक अत्यंत दुर्दैवी आहे.’

तक्रार देण्यास नकार
लोकलमध्ये घडलेल्या या प्रकाराची जीआरपी यांनी दखल घेतली. तुम्हाला ज्या अनुभवातून जावे लागले, त्याबद्दल आम्हाला खेद वाटतो. तुम्हाला यासंदर्भात तक्रार करायची असेल तर संपर्क साधण्याचे आवाहन जीआरपीने केले; मात्र डॉ. मांडवीवाला यांनी तक्रार देण्यास नकार दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com