

Maharashtra Political Turmoil: Defection Fears Force Uddhav Sena Councillor into Hiding
esakal
महाराष्ट्रातील राजकीय वातावरणात सध्या फोडाफोडीच्या खेळाला वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठ्या प्रमाणात यश मिळवले असले तरी अनेक ठिकाणी बहुमतासाठी पक्षांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागत आहेत. यामुळे विरोधी पक्षांना घोडेबाजाराची भीती सतावत आहे. संख्याबळ वाढविण्यासाठी पक्षांच्या नेत्यांची धडपड सुरू झाली असून, नगरसेवकांना आकर्षित करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत (kdmc) उद्धव ठाकरे गटाचे नवनिर्वाचित नगरसेवक फोडाफोडीच्या राजकारणाला वैतागून थेट जंगलात लपल्याची अफवा पसरली आहे.