

Sharad Pawar
esakal
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील टिटवाळा प्रभाग क्रमांक ३ मधील निवडणुकीत एका उमेदवाराच्या नावात गंभीर चूक झाल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शेखर वाकोडेचे नाव EVM आणि डिस्प्लेवर 'शेख वाकोडे' असे दाखवले जात असल्याचा दावा करण्यात आला. या चुकीमुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण झाला असून, निवडणूक आयोगाच्या चुकीचे आरोप होत आहेत.