

डोंबिवली : केडीएमसी हद्दीतील त्या 65 बेकायदा इमारतींवर तोडकामाची कारवाई होणार असून या इमारतीत राहणारे रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत. काही बेकायदा सोसायटीमधील रहिवाशांना नोटीस पाठवून घर खाली करण्याच्या सूचना केल्या जात आहेत. त्यांच्याकडून जबरदस्ती सह्या करुन घेतल्या जात आहेत. पोलिस ठाण्यात त्यांना बोलावून पोलिस बळाचा धाक दाखवून घर खाली करण्यास सांगितले जात आहे. मात्र कबाडकष्ट करुन जमा केलेली पुंजी या घरांमध्ये ओतली असून एक दोन दिवसांत आम्ही रहाते घर का खाली करायचे असा प्रश्न हे रहिवासी करत आहेत. या रहिवाशांच्या पाठीशी शिवसेना ठाकरे गट उभा असून आमदार आदित्य ठाकरे लवकरच याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे यांनी दिली.