कामचुकार रेल्वे पोलिसांवर आता GPS ने राहणार नजर, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लाईव्ह ई-मॉनिटरिंग सिस्टिम

प्रशांत कांबळे
Tuesday, 17 November 2020

मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लागणार लाईव्ह ई-मॉनिटरिंग सिस्टिम

मुंबई, ता. 17 : रेल्वे स्थानक, यार्ड आणि लोकल डब्यांमध्ये कर्तव्य बजावतांना कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आता खैर नाही. अशा कर्मचाऱ्यांवर लाईव्ह ई मॉनिटरिंग सिस्टिमने नजर ठेवल्या जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मोबाईल मध्येएक ऍप्लिकेशन डाउनलोड केले जाणार असून, कामचुकारपणा केल्यास त्याची माहिती रेल्वे पोलिस कंट्रोलला तात्काळ मिळणार आहे.

रेल्वेच्या स्थानकात तैनात असणार्‍या रेल्वे सुरक्षा दलातील जवानांकडून प्रवाशांच्या सुरक्षेची हलगर्जीपणा केला जाते. कर्तव्यावर कर्मचारी हजर नसल्याने अनेक अपघाताच्या घटना सुद्धा घडल्या आहे. शिवाय चोऱ्या, महिला सुरक्षा आणि अनेक गुन्हे घडतात. त्यामुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी तसे अप्लिकेशन तयार केले असून, 28 नोव्हेंबर पासून प्रायोगिक तत्वावर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ते वापरण्यात येणार आहे. 

महत्त्वाची बातमी : शाळांच्याही सुरक्षेची जबाबदारी स्थानिक प्रशासनावर; शिक्षकांचीही कोरोना चाचणी शासकीय केंद्रात

पहिल्या टप्यात मध्य रेल्वेवरील CSMT, दादर, ठाणे, कल्याण आणि LTT या 5 प्रमुख स्थानकांवर तर पश्चिम रेल्वेच्या संपूर्ण मुंबई विभागात ही यंत्रणा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. लॉकडाऊन आधीच लाईव्ह ई-मॉनिटरिंग सिस्टिम राबविण्यावर चर्चा करण्यात आली होती. परंतु लॉकडाऊनमुळे हा उपक्रम रखडला होता. त्यानंतर आता लाईव्ह ई-मॉनिटरिंग सिस्टिम पूर्ण तयार केला असून, रेल्वे पोलिसांनी कर्तव्यावर कामचुकारपणा केल्यास, कठोर कारवाई सुद्धा केली जाणार आहे.

मोबाईल जीपीएस एप्लिकेशनच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. सध्या प्रायोगिक तत्वावर वापर केला जाणार असून, त्यानंतर सरसकट रेल्वे स्थानकावर आणि कर्मचाऱ्यांसाठी याचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांवर आणि गुन्ह्यांना आळा घालण्यास मदत होणार आहे, असे के. के. अशरफ आरपीएफ आयुक्त, मध्य रेल्वे यांनी म्हंटले आहे.

to keep watch on GRP Railway police force GPS will be used by central and western railway


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: to keep watch on GRP Railway police force GPS will be used by central and western railway