भोसरी एमआयडीसीतील जमीन व्यवहाप्रकरणी खडसेंची ईडीकडून साडेसहा तास चौकशी

भोसरी एमआयडीसीतील जमीन व्यवहाप्रकरणी खडसेंची ईडीकडून साडेसहा तास चौकशी

मुंबई - माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांची सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) शुक्रवारी साडेसहा तास चौकशी केली. भोसरी एमआयडीसीतील जमीन व्यवहाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात आली.

 ईडीने मनी लाँडरींगप्रकरणी त्यांना समन्स बजावले होते. त्यानुसार सकाळी 11च्या सुमारास ते ईडी कार्यालयात हजर झाले होते. सायंकाळी सहाच्या सुमारास ते ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडले. आज ईडीच्या कार्यालयात भोसरी भूखंडाप्रकरणी मला चौकशीला बोलवण्यात आले होते. त्याप्रकरणी सखोल चौकशी ईडीच्या माध्यमातून करण्यात आली. ईडीच्या अधिका-यांनी जे काही प्रश्न विचारले त्यांची सविस्तर उत्तरे देण्याचा मी प्रयत्न केला आहे.यापुढेही जे काही कागदपत्र लागतील, जी काही माहिती लागेल, त्यासाठी मी सहकार्य करेन. तसेच यापुढेही ईडी ज्यावेळी मला बोलवले. त्यावेळी मी हजर राहिन, अशी प्रतिक्रिया यावेळी खडसे यांनी व्यक्त केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी) 2017 मध्ये दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे ईडी याप्रकरणी तपास करत आहे. भोसरी येथील जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पुण्यातील एका व्यावसायिकाने केला होता. तक्रारीनुसार या जमीनीची किंमत सुमारे 40 कोटी रुपये असताना ती केवळ 3.75 कोटी रुपयांमध्ये खडसेंच्या कुटुंबियांना विकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2018 मध्ये एसीबीने केलेल्या तपाात खडसे यांना क्लीनचीट देण्यात आली होती. त्यावेळी सरकारने एक समिती स्थापन करून तिच्या माध्यमातूनही याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. ईडीने खडसेंना 30 डिसेंबरला चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. पण प्रकृती अस्वास्थामुळे ते चौकशीला उपस्थित राहिले नव्हते.
ईडी आता याप्रकरणी मनी लाँडरींगप्रकरणी झाली आहे का, याबाबत तपास  करणार आहे. गुन्ह्यांत सहभागी मालमत्तेतील काळा पैसा पुन्हा बाजारात फिरवण्यात आल्याबाबत तपास करण्याचा अधिकार ईडीला आहे. जून्या गुन्ह्यांच्या आधारावर प्रोव्हीजन ऑफ द प्रीव्हेंन्शन ऑफ मनी लाँडरींग अंतर्गत ईडी अशा प्रकरणात तपास करते.

Khadses ED interrogates Bhosari MIDC for six and a half hours in land transaction case

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com