
ठाणे : ठाण्याच्या खोपट येथील राज्य परिवहन सेवेच्या आगारात वाहक तसेच चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह तसेच गरम पाण्याची अद्ययावत सेवा पुरवण्यात आली आहे. राज्यभरातील एसटी आगारात हाच पॅटर्न राबवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.