
मोठी बातमी! सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल, शुक्रवारी रात्री सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महेश वासनीस यांनी सदावर्तेंची बाजू मांडली. (ST Worker Strike) ही कारवाई रोषातून सुरू असल्याचं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्यावतीेने 14 दिवासांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र, दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून झाल्यानंतर न्यायालयाने सदावर्तेंना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (Killa Court sent Gunratna Sadavarte In Police Custody)
हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून बाहेर काढलं, रात्रभरात घडामोडींना वेग
काय म्हणाले सदावर्तेंचे वकील?
सदावर्तेंचे वकील : सरकारने कामगारांबाबत योग्य भूमिका नव्हती. पहिल्या दिवसांपासून कामगारांच्या मागण्या ऐकून घेतल्या जात नव्हत्या. कित्येक कामगारांनी आत्महत्या केली. मात्र सरकारने त्यांची दखलही घेतली नाही. गुणरत्न सदावर्ते यांची भूमिका कायम सरकारच्या विरोधात राहिली आहे. हायकोर्टात सदावर्तेंवर हल्लाही झाला आहे. सदावर्ते हे एक प्रसिद्ध वकील आहेत. सदावर्तेंकडे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांच्याही केसस आहेत.
'बोललेलं वाक्य आणि गुन्ह्यातील एफआयआर जबाब वेगळा'
सदावर्तेंचे वकील : न्यायलयाचा निकाल ७ तारखेला आला. त्यावेळी गुणरत्न सदावर्तेंनी आक्षेपार्ह भाषण केले असे जबाबात म्हटलं आहे. मात्र गुन्ह्यातील जबाबात वापरलेले शब्द आणि प्रत्यक्षात गुणरत्न यांनी म्हटलेलं वाक्य यात तफावत आहे. गुन्ह्यात शरद पवारांच्या बंगल्यात घुसण्याची भाषा केली आहे. मात्र मुलाखतीत तसे शब्दच वापरलेले नाहीत, असा युक्तीवाद गुणरत्न सदावर्ते यांच्या वकिलांमार्फत करण्यात आला.
'जयश्री पाटील यांनीची १०० कोटी वसूली प्रकरणात तक्रार दाखल'
सदावर्तेंचे वकील : कामगार शांततेत आंदोलन करत होते. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना परवानगी दिली होती. जयश्री पाटील यांनीही १०० कोटी वसूली मलबार हिल प्रकरणात तक्रार दाखल केली असून याचिकाही दाखल केलीय. याचच कुठेतरी रोष या कारवाईतून दिसतोय. म्हणूनच अटकेची कारवाई करण्यापूर्वी कोणतीही नोटीस देण्यात आलेली नाही. आम्ही कामगारांची बाजू कोर्टात मांडली. सरकारला कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या. म्हणून रोषातून सरकार कृत्य करत आहे, असं सदावर्तेंचे वकील म्हणाले.
Web Title: Killa Court Ordered Two Days Police Custody To Lawyer Gunratna Sadavarte In St Worker Strike Npk83
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..