esakal | अत्यंत निर्दयी! दुचाकीवर बसली म्हणून मांजरीला बांबूने मारून हत्या; मालकिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

अत्यंत निर्दयी! दुचाकीवर बसली म्हणून मांजरीला बांबूने मारून हत्या; मालकिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

दुचाकीवर बसल्याच्या रागातून मांजराला बांबूने मारून तिची हत्या केल्याप्रकरणी माहिम पोलिसांनी प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एकावर गुन्हा दाखल केला आहे. मांजराच्या मालकिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

अत्यंत निर्दयी! दुचाकीवर बसली म्हणून मांजरीला बांबूने मारून हत्या; मालकिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई  ः दुचाकीवर बसल्याच्या रागातून मांजराला बांबूने मारून तिची हत्या केल्याप्रकरणी माहिम पोलिसांनी प्राणी छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत एकावर गुन्हा दाखल केला आहे. मांजराच्या मालकिणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

तक्रारदार तेजल हेमचंद्र राऊत (वय 30) या माहिम मच्छीमार कॉलनी येथे राहतात. 10 वर्षांपासून त्यांच्याकडे "कलिको' जातीचे मांजर होते. मांजर घरात खाणे-पिणे झाल्यानंतर इमारतीच्या परिसरात फिरत होते. तेथील पार्किंगमध्येही कधीकधी बसायचे. तेथे दुचाकी पार्किंग करण्यात येतात. 2 जानेवारीला मांजर नेहमीप्रमाणे घराबाहेर गेली. त्यानंतर ती मृतावस्थेत सापडली. त्या वेळी तेजल यांच्या वडिलांनी चौकशी केली असता इमारतीतील एका महिलेने सांगितले की, नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रात्री 9.30 च्या सुमारास मांजर पार्कमधील जयंत आरेकर यांच्या दुचाकीवर बसली होती. त्यानंतर आरेकर यांनी तिला बांबूने मारहाण केली. याबाबत विचारणा केली असता आरेकर यांनी मांजर दुचाकीवर बसल्यामुळे आपण तिला बांबूने मारल्याचे सांगितले. त्यानंतर आरेकर यांनी वाद घातला. अखेर तेजल यांनी याप्रकरणी माहिम पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

Killing a cat by hitting it with a bamboo while sitting on a bike in mumbai

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image