पनवेल क्वारंटाईन सेंटरमध्ये महिलेबाबत घडला 'हा' प्रकार.. वाचा बातमी सविस्तर

दीपक घरात - सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

 

पनवेल -  पनवेल आणि नवी मुंबई परिसरातील कोरोना संशंयीतांना किंवा हाय रिस्क लोकांना क्वारंटाईन ची व्यवस्था कोण येथील इंडिया बुल्स येथे करण्यात आली आहे. परंतु या क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका महिलेवर क्वारंटाईन असलेल्याच एका युवकाने बलात्कार केल्याची माहिती समोर आली आहे.

व्हिडिओ: दिल्ली-मुंबई प्रवास अवघ्या १३ तासात, गडकरींनी शेअर केली ब्लू-प्रिंट

 इंडिया बुल्स या इमारतीमध्ये नवी मुंबई आणि पनवेल शहरातील क्वारंटाईन करण्यात आलेल्या लोकांची सोय केली जाते, या इमारतीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्वारंटाईन हे उपचारासाठी किंवा कोरोना आटोक्यात आणण्यासाठी करण्यात येते, परंतु तेथे एका तरुणाने आपली विक्रृती दाखवली आहे. क्वारंटाईन सेंटमध्येच कोरोना संशयीत म्हणून दाखल झालेल्या एका महिलेवर या तरूणाने बलात्कार केल्याची माहिती पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या वतीने देण्यात आली आहे. संबधित प्रकार गुरूवारी मध्यरात्री घडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीने दिली सर्वात मोठी गुड न्यूज, ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा झाला दोन अंकी...

पोलिसांनाी याबाबत तत्काळ कारवाई करत कलम 376 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.. याप्रकरणी पनवेल पोलिस अधिक तपास करीत आहेत. 

------------------------------------

( Edited by Tushar Sonawane )

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This kind of thing happened to a woman in Panvel Quarantine Center .. Read the news in detail

टॉपिकस
Topic Tags: