

डोंबिवली - भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे नातू गिटार वादक आणि ऍक्युपंक्चर थेरपिस्ट किरण फाळके (वय 78) यांचे शनिवारी सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर येथील मोक्षधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई, नातवंड असा परिवार आहे.