
भाजपनेते किरीट सोमय्या यांनीदे देखील धनंजय मुंडे यांच्यावर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे
मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. त्यासोबतच भाजपनेते किरीट सोमय्या यांनीदेखील धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.
रेणू शर्मा नावाच्या महिलेने केलेल्या आरोपानंतर, धनंजय मुंडे यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे. परंतु याबाबत भाजपनेते किरीट सोमय्या यांनी मुंडेंवर घणाघाती टीका केली आहे. एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना सोमय्या म्हटले की, ' मुख्यमंत्री बंगले लपवतात तर, त्यांचे मंत्री बायको लपवतात, तीन महिलांशी संबध असलेले मंत्र्याने सद्य परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत राज्याच्या मंत्रीमंडळातून बाहेर रहावे ' . किरीट सोमय्या यांनी याबाबत एक ट्विट केले आहे.
मुंबई परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार संबंधित महिलेने 10 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांना तक्रारीचे निवेदन दिले आहे. तक्रारदार महिलेने तक्रारीची कॉपी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदार महिलेने केली आहे.
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी याची दखल घेतली असून, आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याविषयावर खुलासा केला आहे. संबंधित महिलेच्या बहिणीशी 2003पासून सहमतीने संबंध होते. त्यातून एक मुलगा आणि मुलगी अशी मुलेही झाली. त्यांना माझे नाव दिले असून, त्यांच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी मी घेतलेली आहे. माझ्या कुटुंबियांना आणि मित्र परिवारालाही हे महिती असून, त्यांनी मुलांचा स्वीकारही केला आहे, अशी पोस्ट धनंजय मुंडे यांनी फेसबुक पेजवर शेअर केली आहे.
Kirit Somaiya criticizes on Dhananjay Munde
-------------------------------------------------